संत रोहिदास महाराज यांचे १३ डोहे (अर्थासहित)
संत रोहिदास दोहे – १
ब्राह्मण मत पूजिए जो होवे गुणहीन,
पूजिए चरण चंडाल के जो होने गुण प्रवीण
गुण नसलेल्या ब्राह्मणाची पूजा करू नये. गुणी व्यक्ती जरी नीच जातीची असली, तरी तिचा सन्मान करावा.
संत रोहिदास दोहे – २
कह रैदास तेरी भगति दूरि है, भाग बड़े सो पावै
तजि अभिमान मेटि आपा पर, पिपिलक हवै चुनि खावै
अहंकारविरहित मनुष्याला ईश्वरभक्ती प्राप्त होते, जशी मुंगी साखर वेचते.
संत रोहिदास दोहे – ३
जा देखे घिन उपजै, नरक कुंड में बास
प्रेम भगति सों ऊधरे, प्रगटत जन रैदास
ज्याच्याकडे पाहून लोक घृणा करत होते, तो प्रेमभक्तीमुळे उध्दार पावला.
संत रोहिदास दोहे – ४
मन चंगा तो कठौती में गंगा
मन पवित्र असेल तर कठोतीमध्येही गंगा वास करू शकते.
संत रोहिदास दोहे – ५
करम बंधन में बन्ध रहियो, फल की ना तज्जियो आस
कर्म मानुष का धर्म है, सत् भाखै रविदास
कर्म करत राहा, कारण तेच माणसाचे खरे धर्म आहे. फलाची आशा ठेवावी.
संत रोहिदास दोहे – ६
मन ही पूजा मन ही धूप,
मन ही सेऊं सहज स्वरूप
पवित्र मन म्हणजेच खरे मंदिर, पूजा आणि धूप आहे.
संत रोहिदास दोहे – ७
कृस्न, करीम, राम, हरि, राघव, जब लग एक न पेखा
वेद कतेब कुरान, पुरानन, सहज एक नहिं देखा
सर्व देव एकच आहेत, केवळ नाव वेगवेगळे आहेत.
संत रोहिदास दोहे – ८
हरि-सा हीरा छांड कै, करै आन की आस
ते नर जमपुर जाहिंगे, सत भाषै रविदास
जो हरिला सोडून इतर अपेक्षा करतो, त्याला नरक प्राप्त होतो.
संत रोहिदास दोहे – ९
रविदास जन्म के कारनै, होत न कोउ नीच
नकर कूं नीच करि डारी है, ओछे करम की कीच
कोणताही माणूस जन्माने नीच नसतो, त्याचे कर्मच त्याला नीच बनवतात.
संत रोहिदास दोहे – १०
जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात,
रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात
जातीभेद माणसाला माणसाशी जोडू देत नाही, हे उन्मूलन गरजेचे आहे.
संत रोहिदास दोहे – ११
रैदास कनक और कंगन माहि जिमि अंतर कछु नाहिं।
तैसे ही अंतर नहीं हिन्दुअन तुरकन माहि।।
सोनं आणि सोन्याचे दागिने यांच्यात फरक नसतो, तसेच हिंदू-मुसलमानामध्येही काही फरक नाही.
संत रोहिदास दोहे – १२
हिंदू तुरक नहीं कछु भेदा सभी मह एक रक्त और मासा।
दोऊ एकऊ दूजा नाहीं, पेख्यो सोइ रैदासा।।
हिंदू आणि मुसलमान दोघेही एका रक्ताचे आहेत; तेच खरे जाणणाऱ्याला समजते.
संत रोहिदास दोहे – १३
वर्णाश्रम अभिमान तजि, पद रज बंदहिजासु की।
सन्देह-ग्रन्थि खण्डन-निपन, बानि विमुल रैदास की।।
वर्णाभिमान सोडून सज्जनांच्या चरणांशी लीन होणाऱ्याला रोहिदासांची निर्मळ वाणी जीवनदायी ठरते.