जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ - संस्कृती आणि शिक्षणाचा संगम

Share This
जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ - संस्कृती आणि शिक्षणाचा संगम 2025

जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ: संस्कृती आणि शिक्षणाचा संगम! 🚩

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठ, चिखली, पुणे येथे प्रेक्षागृह व कलादालनाचे उदघाटन संपन्न झाले.

संत मल्हारपंत कुलकर्णी गायन कक्ष, संत सोनबा ठाकुर पखवाज कक्ष, पंडित अरविंद मुळगावकर तबला कक्ष आणि आलीजाबहाद्दर ह.भ.प. महादजी शिंदे सभागृहाचेही लोकार्पण करण्यात आले.

मुख्यमंत्र्यांचे भाषण

मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राला मोठी संत परंपरा लाभली आहे. संत परंपरा जपण्याचे काम या संतपीठामार्फत होणार आहे. या ठिकाणाला वैश्विक स्वरूप देण्याचे काम करण्यात आले आहे.

येथे संपूर्ण संत साहित्य CBSC अभ्यासक्रमानुसार संस्कृत, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमधून शिकविले जाणार आहे. विविध वाद्यांचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे.

या प्रकल्पाच्या अंतर्गत पंढरपूर व आळंदी येथे उभारल्या जाणाऱ्या संतपीठांना राज्य शासनाची मदत राहणार आहे.

संस्कृतीचे पुढील पिढ्यांपर्यंत स्थानांतरण

आपली संस्कृती, संतांचे विचार आणि परंपरा जगापर्यंत पोहोचवण्यासाठी ती प्रथम पुढील पिढीपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. या संतपीठातून शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्माचा प्रसार जगभर करतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

मराठी भाषेची प्रगती

नवीन शैक्षणिक धोरणामुळे मराठी भाषेला ज्ञानभाषा बनवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठीला वैश्विक भाषा, अर्थकारणाची भाषा बनवण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. सर्व शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली आहे.

उपस्थित मान्यवर

या समारंभाला खा. श्रीरंग आप्पा बारणे, आ. महेश लांडगे, आ. अमित गोरखे, संतपीठाचे संचालक, पदाधिकारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.


#संतपीठ #तुकाराममहाराज #चिखली #शिक्षण #संस्कृती

३ टिप्पण्या: