संत मुक्ताई अभंग गाथा
संत मुक्ताबाई अभंग – पाळणे
अभंग– १
चांगा जन्मला माध्यान्ह काळीं ।
मायबापें दोन्ही नाहीसीं जालीं ॥१॥
मुळींच चांगा नाहींसा जाला ।
मुक्ताई म्हणे चांगया भलाभला ॥२॥
वटेश्वर चांगा मुळीं लागला ।
पोसणा घेतला मुक्ताईनें ॥३॥
मायबापें दोन्ही नाहीसीं जालीं ॥१॥
मुळींच चांगा नाहींसा जाला ।
मुक्ताई म्हणे चांगया भलाभला ॥२॥
वटेश्वर चांगा मुळीं लागला ।
पोसणा घेतला मुक्ताईनें ॥३॥
अभंग– १
बाळक चुकलें सुकुमार तान्हुलें ।
त्यानें पै सांडिलें मायाजाळ ॥१॥
जो जो जो जो पुत्रातें निजवी ।
अनुहात बोवी नि:शब्दाची ॥२॥
मावळली दिशा वाचा पे खुंटली
माया मै भेटली मुक्ताबाई ॥३॥
मुक्ताई म्हणे नांव पे ठेवीन
सुता बोलाविन वटेश्वरा ॥४॥
त्यानें पै सांडिलें मायाजाळ ॥१॥
जो जो जो जो पुत्रातें निजवी ।
अनुहात बोवी नि:शब्दाची ॥२॥
मावळली दिशा वाचा पे खुंटली
माया मै भेटली मुक्ताबाई ॥३॥
मुक्ताई म्हणे नांव पे ठेवीन
सुता बोलाविन वटेश्वरा ॥४॥
अभंग– १
ब्रह्मांड गोळकीं पवनाच्या पालखीं ।
अवधूत कवतुकीं पहुडलासे ॥१॥
बोलवी चांगया मुक्ताई माता ।
ब्रह्मविद्या पर्यदं सुख देखतां ॥२॥
डोळा लाउनि निजी निजेला
निवांत स्वप्नीं वटेश्वर देखिला निवांत ॥३॥
अवधूत कवतुकीं पहुडलासे ॥१॥
बोलवी चांगया मुक्ताई माता ।
ब्रह्मविद्या पर्यदं सुख देखतां ॥२॥
डोळा लाउनि निजी निजेला
निवांत स्वप्नीं वटेश्वर देखिला निवांत ॥३॥
अभंग– १
गुण ना निर्गुण शब्दातीत तेथें
तूं निश्चित निज बाळा ॥१॥
पाळणा लाविला हृदय कमलीं ।
मुक्ताई जवळी सादविते ॥२॥
शांति क्षमा दया विदेह वर्णिती
नांव में ठेविती अद्वैतासी ॥३॥
वटेश्वर सुत चांगा अवधूत
मुक्ताई शांती ज्ञानदृष्टी ॥४॥
तूं निश्चित निज बाळा ॥१॥
पाळणा लाविला हृदय कमलीं ।
मुक्ताई जवळी सादविते ॥२॥
शांति क्षमा दया विदेह वर्णिती
नांव में ठेविती अद्वैतासी ॥३॥
वटेश्वर सुत चांगा अवधूत
मुक्ताई शांती ज्ञानदृष्टी ॥४॥
अभंग– १
निर्गुणाचे डाळीं पाळणा लाविला ।
तेथें सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥
निज निज बाळा न करी पैं आळी
अनुहात टाळी वाजविते ॥२॥
तेथे निद्रा ना जागृती भोगी में
उन्मनी लक्ष तो भेनि निजना तो॥३॥
निभ्रांत पाळी पाळणा विणवूनी मन
हैं बांधोनि पवन दोरी ॥४॥
एकाविस सहस्र सहाशे वेळे बाळा।
तेही डोळा स्थिर करी ॥५॥
निद्रा ना जागृति निजसी वा काई
परियेसी चांगया बोले मुक्ताबाई ॥६॥
तेथें सुत पहुडला मुक्ताईचा ॥१॥
निज निज बाळा न करी पैं आळी
अनुहात टाळी वाजविते ॥२॥
तेथे निद्रा ना जागृती भोगी में
उन्मनी लक्ष तो भेनि निजना तो॥३॥
निभ्रांत पाळी पाळणा विणवूनी मन
हैं बांधोनि पवन दोरी ॥४॥
एकाविस सहस्र सहाशे वेळे बाळा।
तेही डोळा स्थिर करी ॥५॥
निद्रा ना जागृति निजसी वा काई
परियेसी चांगया बोले मुक्ताबाई ॥६॥
अभंग– १
अविनाश पाळणा अव्यक्तं विणीला
तेथें योगीराज पहुडला ॥१॥
जो जो जो जो म्हणतसे माया।
साकारातीत निजरे चांगया ॥२॥
सोहं सोहं षट्चक्र न्यासे तु
परिये देता मीच न दिसे ॥३॥
ऐसी निद्रा तुज लागोरे पुत्रा
मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा ॥४॥
तेथें योगीराज पहुडला ॥१॥
जो जो जो जो म्हणतसे माया।
साकारातीत निजरे चांगया ॥२॥
सोहं सोहं षट्चक्र न्यासे तु
परिये देता मीच न दिसे ॥३॥
ऐसी निद्रा तुज लागोरे पुत्रा
मुक्ताई खेचरा उपदेशी मंत्रा ॥४॥
अभंग– १
सुखाचे शेवटीं दुःख आलें भेटी
भेटीलिया साठीं तेही नुरे ॥१॥
सुख तें कवण दुःख तें कवण
दोही अज्ञान करीं पारे ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया चैयी
स्वयंभू चेड़ला वटेश्वरापायीं ॥३॥
भेटीलिया साठीं तेही नुरे ॥१॥
सुख तें कवण दुःख तें कवण
दोही अज्ञान करीं पारे ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया चैयी
स्वयंभू चेड़ला वटेश्वरापायीं ॥३॥