संत मुक्ताई अभंग गाथा – भाग ३ (संतपर)

संत मुक्ताई अभंग गाथा – भाग ३

संत मुक्ताई अभंग गाथा

भाग ३ – संतपर

संतपर अभंग १६
आदि अंतु हरि सर्वां घटीं पूर्ण ।
जाणोनि संतजन प्रेमभरित ॥१॥
रामनाम चिर्चे प्रेम वोसंडत ।
नित्यानित्य तृप्त हरिभक्ती ॥२॥
शांति क्षमा दया सावध पैं चित्तीं ।
आनंदे डुल्लती सनकादिक ॥३॥
मुक्ताई म्हणे नाम श्रीहरीचे जोडी।
नित्यता आवडी चरणसेवे ॥४॥
अभंग १७
परब्रह्मीं चित्त निरंतर धंदा ।
तथा नाहीं कदा गर्भवास ॥१॥
उपजोनी जनीं धन्य ते योनी ।
चित्त नारायण मुक्तलग ॥२॥
अव्यक्तीं पैं व्यक्ति चित्तासि अनुभव ।
सर्व सर्व देव भरला दिसे ॥३॥
ज्ञेय ज्ञाता ज्ञान उन्मनी विज्ञान ।
चित्त नारायण झालें त्याचें ॥४॥
आदि अंतीं हरि सर्व त्याचा जाला ।
परतोनि अबोला प्रपंचैसी ॥५॥
मुक्ताईचे निरंतर मुक्त ।
हरि सिंचित आम्हां घरीं ॥६॥
अभंग १८
सर्व सर्व सुख अहं तेचि दुःख ।
मोहममता विष त्यजीयेलें ॥१॥
साधक बाधक करूनि विवेक ।
मति मार्ग तर्क शोधियेला ॥२॥
सर्वतीर्थ हरि दुमाळु धनुवो।
चोळला कणवा चातकाचा ॥३॥
सूक्ष्ममार्ग त्याचा भक्त देहीं मायेचा।
आकळावयाचा सत्त्व घरीं ॥४॥
वेद जंव वाणी श्रुति तुपें ।
काहाणी ऐको जाय ।
कर्णी तंव परता जाय ॥५॥
मुक्ताई सोहंभावें भरलें दिसे देवें।
मूर्तामूर्त सोहंभावे हरि घोटी ॥६॥
अभंग १९
पूजा पूज्य वितें पूजक पैं चित्ते ।
पाली दंडवतें भाव शीळ ॥१॥
चंपक सुमनें पूजी कातळीनें ।
धूप दिप मनें मानसिक॥२॥
भावातीत भावो वोगरी अरावो ।
पाहुणा पंढरीरावो हरि माझा ॥३॥
मुक्ताई संपन्न विस्तारूनि अन्न ।
सेवी नारायण हरि माझा ॥४॥
अभंग २०
अविट हे न विटे हरिचे हे गुण ।
सवे सनातन ध्यातां रूपें ॥१॥
साध्य हैं साधन हरिरूपें ध्यान ।
रामकृष्णकीर्तन मुक्त आम्हीं ॥२॥
असंधि बटु नटलों में साधे नाहीं ।
त्या यमाचें भय आम्हां ॥३॥
मुक्तता पूर्णता मुक्ताई साधिली ।
साधना दिधली चांगयासी ॥४॥
अभंग २१
व्यक्त अव्यक्तीचें रूपस मोहाचें।
एकतत्त्व दीपाचें हृदयीं नांदे ॥१॥
चांगवा फावलें फावोनी घेतलें।
निवृत्तीनें दिवले आमुच्या करीं ॥२॥
आदि मध्य यासी सर्वत्र निवासी ।
एक रूपें निशी दवडितु ॥३॥
मुक्ताई पूर्णता एकरूपें चित्ता ।
आदि अंतु कथा सांडियेली ॥४॥
अभंग २२
मनें मन चोरी मनोमय ।
धरी कुंडली आधारी सहस्रवरी॥१॥
मन है वोगरु आदि हरिहरु ।
करी पाहुणेरु आदिरूपा॥२॥
सविया विसरू घेसील पडिमरु ।
गुरुकृपा विरु विरे सदां ॥३॥
मुक्ता मुक्तचित्तें गुरुमार्ग विते ।
पावन त्वरिते भव भाव ॥४॥
अभंग २३
सर्व रूपी निर्गुण संचलें में सर्वदा ।
आकार संपदा नाहीं तया ॥१॥
आकारिती भक्त मायामय काम ।
सर्वत्र निःसीम अंतरी आहे ॥२॥
निवृत्तीचा उच्छेदु निवृत्ति तत्त्वता ।
सर्वही समता सांगितली ॥३॥
मुक्ताई अविट मुक्तपंथरत ।
जीवीं शिवीं अनंत तत्त्वविद ॥४॥
अभंग २४
उर्णाचिया गळां बांधली दोरी।
पाहों जाय घरीं तंव तंतु नाहीं ॥१॥
तैसें झालें बाई जंव एकतत्त्व नाहीं ।
दुजी जंव साई तंव है अंध॥२॥
ऐसी मी हो अंध जात होतें वायां ।
प्रकृति सावया पावली तेथें ॥३॥
मुक्ताई सावध करी निवृत्तिराज ।
हरिप्रेमें उमज एकतत्त्वें ॥४॥
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने