संत मुक्ताई अभंग गाथा
संत मुक्ताबाई अभंग – चांगदेव संवाद (उपदेश)
अभंग– १
स्वप्नींची आत्मा केउता आहे ।
मागुता ये हैं नवल काई ॥१॥
चांगा म्हणे आहे सांग मुक्ताबाई ।
लटिकें साथ वर्ततें देहीं ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया मिस्त ।
देहीं निर्धारीं राही स्वप्न कैचें ॥३॥
मागुता ये हैं नवल काई ॥१॥
चांगा म्हणे आहे सांग मुक्ताबाई ।
लटिकें साथ वर्ततें देहीं ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया मिस्त ।
देहीं निर्धारीं राही स्वप्न कैचें ॥३॥
अभंग– २
बंधन नाहीं बद्ध नाहीं ।
साच कीं लटिकें तेंही नाहीं ॥१॥
भेद नाहीं भेदसी काई ।
साच कीं लटिकें वर्तते देहीं ॥२॥
चांगा म्हणे सांग मुक्ताबाई ।
साच कीं लटिकें वर्तते देहीं ॥३॥
साच कीं लटिकें तेंही नाहीं ॥१॥
भेद नाहीं भेदसी काई ।
साच कीं लटिकें वर्तते देहीं ॥२॥
चांगा म्हणे सांग मुक्ताबाई ।
साच कीं लटिकें वर्तते देहीं ॥३॥
अभंग– ३
मी माझें दुरित आशापाश चित्तीं ।
मोह ममता भ्रांति अहंभावें ॥१॥
हरितसे तेज अभिमान ताठा ।
एकतत्त्वें वैकुंठा हरिपाठें ॥२॥
नाशिवंत देह पंचतत्त्वमोळी ।
पायांच वाहादुळी उडोनि जाये ॥३॥
मुक्ताई जीवन चांगया दिधलें ।
निर्गुणी साधिलें घर कैसें ।
मोह ममता भ्रांति अहंभावें ॥१॥
हरितसे तेज अभिमान ताठा ।
एकतत्त्वें वैकुंठा हरिपाठें ॥२॥
नाशिवंत देह पंचतत्त्वमोळी ।
पायांच वाहादुळी उडोनि जाये ॥३॥
मुक्ताई जीवन चांगया दिधलें ।
निर्गुणी साधिलें घर कैसें ।
अभंग– ४
नाहीं सुखदुःख पापपुण्य नाहीं ।
नाहीं कर्मधर्म कल्पना नाहीं ॥१॥
नाहीं मोक्ष ना भवबंधन नाहीं ॥२॥
म्हणें वटेश्वरा ब्रह्म नाहीं ।
सहजसिद्ध बोले मुक्ताई ॥३॥
नाहीं कर्मधर्म कल्पना नाहीं ॥१॥
नाहीं मोक्ष ना भवबंधन नाहीं ॥२॥
म्हणें वटेश्वरा ब्रह्म नाहीं ।
सहजसिद्ध बोले मुक्ताई ॥३॥
अभंग– ५
हेमी हेम प्रचित पाही ।
अनुभव आलिया सांगा तें काई ॥१॥
सोहंकर मन न सोडी साचे ।
मी नाहीं तेथे तूं कैचें ॥२॥
अहंतेसी सोहं से गुज ।
मुक्ताई म्हणे चांगया बुझ ॥३॥
अनुभव आलिया सांगा तें काई ॥१॥
सोहंकर मन न सोडी साचे ।
मी नाहीं तेथे तूं कैचें ॥२॥
अहंतेसी सोहं से गुज ।
मुक्ताई म्हणे चांगया बुझ ॥३॥
अभंग– ६
ऐकें चांगया फळ फळासी आलें ।
येऊनियां नासून गेलें ॥१॥
सोडी सोडी भवाची भ्रांति ।
तेणें होय अज्ञान निवृत्ति ॥२॥
चांगा वटेश्वरीं फळला ।
विज्ञानफळीं परिपाका आला ॥३॥
येऊनियां नासून गेलें ॥१॥
सोडी सोडी भवाची भ्रांति ।
तेणें होय अज्ञान निवृत्ति ॥२॥
चांगा वटेश्वरीं फळला ।
विज्ञानफळीं परिपाका आला ॥३॥
अभंग– ७
रूप ना छाया त्रिगुणरहित ।
ज्योतिस्वरूप हैं पा नित्य ॥१॥
जाणें येणे नाहीं निर्गुण पाही ।
चैतन्य होई शुद्धबुद्ध ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया वटेश्वरा ।
निरुता पाहे स्वयें साकारा ॥३॥
ज्योतिस्वरूप हैं पा नित्य ॥१॥
जाणें येणे नाहीं निर्गुण पाही ।
चैतन्य होई शुद्धबुद्ध ॥२॥
मुक्ताई म्हणे चांगया वटेश्वरा ।
निरुता पाहे स्वयें साकारा ॥३॥
अभंग– ८
जेथें एक दुजें नाहीं प्रपंचाची ।
काहाणी तेथें कांहीं ॥१॥
तेथे काहींच नाहीं तेथें कांहींच ।
नाहीं सोय धरि आपुली रे ॥२॥
वटेश्वरमुतातें बोले मुक्ताई ।
सोहंभायें अखंडित राही ॥३॥
काहाणी तेथें कांहीं ॥१॥
तेथे काहींच नाहीं तेथें कांहींच ।
नाहीं सोय धरि आपुली रे ॥२॥
वटेश्वरमुतातें बोले मुक्ताई ।
सोहंभायें अखंडित राही ॥३॥
अभंग– ९
रावळीचे कर चुकले जाण ।
गिवसिताती साहीजण वेळोवेळा ॥१॥
करी कर धरियला मुष्टी ।
करें ‘आपुल्या समावलें दृष्टीं ॥२॥
मुक्ताई करें लेईलें अंजन ।
चांगया निधान उपदेशिलें ॥३॥
गिवसिताती साहीजण वेळोवेळा ॥१॥
करी कर धरियला मुष्टी ।
करें ‘आपुल्या समावलें दृष्टीं ॥२॥
मुक्ताई करें लेईलें अंजन ।
चांगया निधान उपदेशिलें ॥३॥
अभंग– १०
कावरी कल्पावरी एक कुली ।
तेथे एक पाळी दिस्मो करी ॥१॥
तियें नांव काय त्याचे नांव ।
काय विचारोनि पाहे मनामाजी ॥२॥
डोळियांतील बाहुली जालीसे गरुवारू ।
तिशी सुई मेळवा अरुवारू ॥३॥
सुईचें आणीवर रचिलें पाठार मुक्ताई ।
म्हणे चांगया सांग याचा विचार ॥४॥
तेथे एक पाळी दिस्मो करी ॥१॥
तियें नांव काय त्याचे नांव ।
काय विचारोनि पाहे मनामाजी ॥२॥
डोळियांतील बाहुली जालीसे गरुवारू ।
तिशी सुई मेळवा अरुवारू ॥३॥
सुईचें आणीवर रचिलें पाठार मुक्ताई ।
म्हणे चांगया सांग याचा विचार ॥४॥
अभंग– ११
आकाशाचा शेंडा घार ।
रांधी मांडा काउळा वादी ।
कांदा कुल्लाळ भोजन करी ॥१॥
दिहा पडे चांदणें रात्रीं ।
पडे उष्ण चोर घरटी पाली ।
तराळ घाली खाण ॥२॥
सासुनें खादलें उंडे ।
सुन तरळे लेकी लासिली ।
जांवाई गडबडा लोळे ॥३॥
धमकत घुसळण घातलें पारी ।
वटेश्वरमुता म्हणे मुक्ताई अवधारी ॥४॥
रांधी मांडा काउळा वादी ।
कांदा कुल्लाळ भोजन करी ॥१॥
दिहा पडे चांदणें रात्रीं ।
पडे उष्ण चोर घरटी पाली ।
तराळ घाली खाण ॥२॥
सासुनें खादलें उंडे ।
सुन तरळे लेकी लासिली ।
जांवाई गडबडा लोळे ॥३॥
धमकत घुसळण घातलें पारी ।
वटेश्वरमुता म्हणे मुक्ताई अवधारी ॥४॥
अभंग– १२
भावेंभक्ति करूनी वैराग्य जोडसी ।
तरी तूं पावसी ब्रह्म सुख ॥१॥
ज्ञानतत्त्वीं करी करी हा विचार ।
निर्गुणीं आकार निरामय ॥२॥
चांग्या सोय धरी ज्ञानवटेश्वरी ।
मुक्ताई जिव्हारीं बोध करी ॥३॥
तरी तूं पावसी ब्रह्म सुख ॥१॥
ज्ञानतत्त्वीं करी करी हा विचार ।
निर्गुणीं आकार निरामय ॥२॥
चांग्या सोय धरी ज्ञानवटेश्वरी ।
मुक्ताई जिव्हारीं बोध करी ॥३॥
अभंग– १३
ऐलाड हुडाचे पैलाड हुडाचे ।
जागवा जागवा हरीचे ॥१॥
भलेरे भलेरे दास गोपाळाचे ॥२॥
भक्तिबोधें बोधले साचें ।
चांगदेव म्हणे वटेश्वराचें ॥३॥
जागवा जागवा हरीचे ॥१॥
भलेरे भलेरे दास गोपाळाचे ॥२॥
भक्तिबोधें बोधले साचें ।
चांगदेव म्हणे वटेश्वराचें ॥३॥
अभंग– १४
सोहं होतें तें कोहं जालें ।
निज विसरलें काय सांगों ॥१॥
मार्ग चुकला विसर पडिला ।
वरपडा जाला विषयचोरा ॥२॥
वटेश्वर चांगा ज्ञानदीपें उजळला ।
सोहं शब्द लावियला बाईयानो ॥३॥
निज विसरलें काय सांगों ॥१॥
मार्ग चुकला विसर पडिला ।
वरपडा जाला विषयचोरा ॥२॥
वटेश्वर चांगा ज्ञानदीपें उजळला ।
सोहं शब्द लावियला बाईयानो ॥३॥
अभंग– १५
मुक्त होतासि तो कां ।
बद्ध जालासी आपल्या ।
बंधने आपण बांधलासी ॥१॥
सांडी बंधन सोय धरी गव्हारा ।
जाई मूळस्थाना आपुलिया ॥२॥
तेथींचा तेथें राही परीयेसी ।
चांगयाशीं बोले मुक्ताई॥३॥
बद्ध जालासी आपल्या ।
बंधने आपण बांधलासी ॥१॥
सांडी बंधन सोय धरी गव्हारा ।
जाई मूळस्थाना आपुलिया ॥२॥
तेथींचा तेथें राही परीयेसी ।
चांगयाशीं बोले मुक्ताई॥३॥
अभंग– १६
तुझा तूं चुकलासी ।
गिवसुनी घेई सांगी देह ।
वासना नाहीं तें घेई ॥१॥
सोहं सोहं हा घेई ।
विचार है जाणतो वटेश्वर ॥२॥
शब्दातीत जाणोनि निरुतें ।
चांगया वटेश्वरीं जन्म भरितें ॥३॥
गिवसुनी घेई सांगी देह ।
वासना नाहीं तें घेई ॥१॥
सोहं सोहं हा घेई ।
विचार है जाणतो वटेश्वर ॥२॥
शब्दातीत जाणोनि निरुतें ।
चांगया वटेश्वरीं जन्म भरितें ॥३॥
अभंग– १७
भ्रमराचे मरण कमळणीपुष्प ।
तैसें योगियां सेवी शेषमुख ॥१॥
आवडी वालमा डोळ्यांदेख ।
तैसें पाहे सुख ज्ञानदृष्टीं ॥२॥
जोडिलें सुख नव जाये ।
तैसा चांगा पाहे वटेश्वर ॥३॥
तैसें योगियां सेवी शेषमुख ॥१॥
आवडी वालमा डोळ्यांदेख ।
तैसें पाहे सुख ज्ञानदृष्टीं ॥२॥
जोडिलें सुख नव जाये ।
तैसा चांगा पाहे वटेश्वर ॥३॥
अभंग– १८
मनसंकल्प शुद्ध नव्हे न्हवीं ।
सदोदित आहे चिदानंदी ॥१॥
मनातें बुडनी इंद्रियांत दंडुनी ।
भी हैं सोडुनी सोहं धरी ॥२॥
चांगावटेवरी सोहं झाला ।
अवघाचि बुडाला ज्ञानडोही ॥३॥
सदोदित आहे चिदानंदी ॥१॥
मनातें बुडनी इंद्रियांत दंडुनी ।
भी हैं सोडुनी सोहं धरी ॥२॥
चांगावटेवरी सोहं झाला ।
अवघाचि बुडाला ज्ञानडोही ॥३॥
अभंग– १९
नोवरीच्या गळां तुळशीच्या माळा ।
बन्हाडी सकळां तुम्ही व्हावे ॥१॥
मांडला आपुला मांडला आपुला ।
मांडला आपुला घराचार ॥२॥
घरमायेचं चीर वोहो माय नेसली ।
त्या आम्हां भली सोयरीक झाली ॥३॥
वटेश्वर नोवरीचे पाठी ।
रानकादिक गोष्टी करिताती ॥४॥
बन्हाडी सकळां तुम्ही व्हावे ॥१॥
मांडला आपुला मांडला आपुला ।
मांडला आपुला घराचार ॥२॥
घरमायेचं चीर वोहो माय नेसली ।
त्या आम्हां भली सोयरीक झाली ॥३॥
वटेश्वर नोवरीचे पाठी ।
रानकादिक गोष्टी करिताती ॥४॥
अभंग– २०
देवी देवो जाला भावसी अबोला ।
निमोनि उरला आपपरे ॥१॥
आधीं आप वाहीं मग पडें वाहीं ।
प्रपंच डोहीं बुडो नका ॥२॥
जंब नाहीं कृपा गुरु फळ बापा ।
तंव कैसेनी दीपा पावशील ।
मुक्ताई चांगया तत्त्वं तत्त्व लया ।
हरिभावीं माया हरपली ॥४॥
निमोनि उरला आपपरे ॥१॥
आधीं आप वाहीं मग पडें वाहीं ।
प्रपंच डोहीं बुडो नका ॥२॥
जंब नाहीं कृपा गुरु फळ बापा ।
तंव कैसेनी दीपा पावशील ।
मुक्ताई चांगया तत्त्वं तत्त्व लया ।
हरिभावीं माया हरपली ॥४॥
अभंग– २१
मुक्त होतासि तो बंध पावसी ।
आपुल्या दोरी आपण बांधिलासी ॥१॥
सोप घरी मूळस्थान न सोडी ।
बंधन तोडी आलियारे ॥२॥
चांगा वटेश्वरी विनवितो दातारा ।
वायांची संसारा आणियलें ॥३॥
आपुल्या दोरी आपण बांधिलासी ॥१॥
सोप घरी मूळस्थान न सोडी ।
बंधन तोडी आलियारे ॥२॥
चांगा वटेश्वरी विनवितो दातारा ।
वायांची संसारा आणियलें ॥३॥
अभंग– २२
मोळी विकुनी खीर वोखटी ।
आंबिल गोमटी बैसलिया ॥१॥
कन्हे बारा गांवे येरझारा करी ।
शेख पोट भरी कांट्यावरी ॥२॥
बुडीं फळ लाभे तरी ।
शेंडिया का धावे वायां ।
कां भोंवतें भोंवे चांगा म्हणे ॥३॥
आंबिल गोमटी बैसलिया ॥१॥
कन्हे बारा गांवे येरझारा करी ।
शेख पोट भरी कांट्यावरी ॥२॥
बुडीं फळ लाभे तरी ।
शेंडिया का धावे वायां ।
कां भोंवतें भोंवे चांगा म्हणे ॥३॥