संत मुक्ताबाई अभंगगाथा – संत नामदेवांचा मुक्ताबाईने केलेला भक्तिगवं परिहार

संत मुक्ताबाई अभंग – संत नामदेवांचा मुक्ताबाईने केलेला भक्तिगवं परिहार

संत मुक्ताई अभंग गाथा

संत मुक्ताबाई अभंग – संत नामदेवांचा मुक्ताबाईने केलेला भक्तिगवं परिहार

अभंग– १
उठले निवृत्ति संतांच्या दर्शना ।
पंढरीच्या प्रेमा घरा आला ॥१॥
केली प्रदक्षिणा वदिले चरण ।
झाला अभिमान नामवासी ॥२॥
देवाजवळी आम्ही निरंतर ।
यासी अधिकार नमस्कारा ॥३॥
नित्य समागम हरिच्या चरणी ।
हे आणि आम्ही देवभक्त ॥४॥
नामा म्हणे काय वंदू यांचे ।
चरण अंगे परब्रह्म मजपाशी ॥५॥
अभंग– २
उठले ज्ञानेश्वर केले ते वंदन ।
मस्तकी चरण नमस्कारिलें ॥१॥
नामा म्हणे आम्हा वडिल अधिकारु ।
यासाठी नमस्कारु योग्य आहे ॥२॥
आम्ही देवापाशी असतो सर्व ।
काळ येउनी सकळ वंदिताती ॥३॥
वैष्णवांचे भार देव सुरगण ।
येताती शरण पंढरीशी ॥४॥
नामा म्हणे आता पाहिली मंडळी ।
यासाठी वनमाळी स्फुंदु लागे ॥५॥
अभंग– ३
आला तो सोपान वंदियले त्या पायी ।
पांडुरंगा ठायी मानियेला ॥१॥
रंजल्या गांजल्यांचा घेतला समाचार |
संत माय थोर अनाथांची ॥२॥
आमची माय बाप भेटलीत आज ।
समाधान सहज अलिंगता ॥३॥
नामा म्हणे मज कळले याचे प्रेम ।
देवे केले श्रम काय गुणे ॥४॥
अभंग– ४
अखंड जयाला देवाचा शेजार ।
कां रे अहंकार नाहीं गेला ॥१॥
मान अपमान वाढविसी हेवा ॥
दिवस असतां दिवा हातीं घेसी ॥२॥
परब्रह्मासंगें नित्य तुझा खेळ ॥
आंधळे पां डोळे कां वा जाले ॥३॥
कल्पतरुतळवटीं इच्छिली ते गोष्टी ।
अद्यापि नरोटी राहिली कां ॥४॥
घरीं कामधेनु ताक मागूं जाय ।
ऐसा द्वाड आहे जगामाजीं ॥५॥
म्हणे मुक्ताबाई जाई दरुषणा ।
आधीं अभिमाना दूर करा ॥६॥
अभंग– ५
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताई ।
म्हणती ज्ञान कायी कथुनीया ॥१॥
भक्तिचीया बळे देव पैं जिंकला ।
ऋणात केला कैसा येणे ॥२॥
धन्य तो भाविक नामा आणि कबीर ।
रोहिदास चांभार बहिरपिसा ॥३॥
त्यांची पाय धुळी वंदिता कपाळी ।
वंशहि समुळी उद्धरती ॥४॥
नामा म्हणे मुक्ताबाई ऐका स्पष्ट ।
भक्तिहून श्रेष्ट आणिक नाही ॥५॥
अभंग– ६
झालासी हरिभक्त तरी आम्हां ।
काय आंतली ती सोय न ठाऊकी ॥१॥
घेऊनि टाळ दिंडी हरिकथा करिसी ।
हरिदास म्हणविसी श्रेष्ठपणें ॥२॥
गुरुविण तुज नव्हेचि गा मोक्ष ।
होशिल मुमुक्षु साधक तूं ॥३॥
आत्मतत्त्वी दृष्टी नाहींच यां केली ।
तंववरी ब्रह्मबोली बोलुनि काय ॥४॥
तुझें जरी रूप तुवां नाहीं ओळखिलें ।
अहंतेतें धरिलें कासयासी ॥५॥
आमुचें तूं मूळ जरी पुसतोसी ।
तुझें तूं अपेशी पाहुनि घेई ॥६॥
ऐक रे नामया होई आत्मनिष्ठ ।
तरीच तूं श्रेष्ठ ज्ञानी म्हणे ॥७॥
अभंग– ७
बोलोनियां येर्णे वाढविला डांगोरा ।
अंतरींचा कोरा गुरुविण ॥१॥
संतांचा सन्मान कळेना जयासी ।
राहुनि देवापाशीं काय केलें ॥२॥
परिसा झांकण घातलें खापर ।
नाहीं जाले अंतर बावनकस ॥३॥
खदिरांगारी शृंगारी हिलाल ।
अंतरींचे काळें गेलें नाहीं ॥४॥
म्हणे मुक्ताबाई अभिमानें नेलें ।
सर्पा पाजियेलें विष तेंचि ॥५॥
अभंग– ८
अमृत टाकुन कांजीची आवडी
साजेना झोपडी काय त्याला ॥१॥
खरासी अखंड गंगेचें हो स्नान ।
गेलें वायांविण जिणें त्याचें ॥२॥
पोवळ्यापरिस दिसती रानगुंजा
शृंगाराच्या काजा न येती त्या ॥३॥
आनारा परिस चोखट इंद्रावन
चवी कडुपण हीन त्याचें ॥४॥
रंगाची बाहुली दिसती साजिरी ।
बेगडाचे परी नग ल्याली ॥५॥
म्हणे मुक्ताबाई पुरे तें दर्शन ।
गुरुविण संतपण आहे कोठें ॥६॥
अभंग– ९
उसाचे सेजारी येरंडाचें झाड नाहीं ।
त्याचा पाड गोडी आली ॥१॥ ।
कर्पूरासी जाला दीपाचा शेजार ।
काय गुर्णे सार राहिल त्याचा ॥२॥
सागरीं लवण टाकिलें नेऊन ।
काय गुण खडेपण उरलें त्याचें ॥३॥
तैसा नामदेव विठोबाच्या जागा ।
काय गुर्णे या गा कोरेपण ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चंदनाचें झाड ।
अहंतासर्प वेढे गुंडाळिले ॥५॥
अभंग– १०
संत पाहुणे सज्जनाचे घरी पूजा ।
करितां वरी डोई काढी ॥१॥
करितां सन्मान अंगी भरे ताटा ।
देवा पै करंटा असुनी काय ॥२॥
अहंता हा खुंट वाढविला चित्तीं ।
न साहे संगती सजनाची ॥३॥
पंढरीचें भूषण सांगतो जनांसी ।
नाहीं या मनासी तीळ बोध ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चांगदेवा वाणी ।
भजावा सज्जनीं नामदेव ॥५॥
अभंग– ११
चौदाशें वरुर्षे शरीर केलें जतन ।
बोधाविण शिण वाढविला ॥१॥
नाहीं गुरुमंत्र नाहीं उपदेश ।
परमार्थासि दोष लावियेला ॥२॥
स्वहिताचें कारण पडियेलें जेव्हां ।
शरण आला तेव्हां आळंकापुरीं ॥३॥
गैनीनार्थे गुज दिलें निवृत्तीला ।
निवृत्तीचा जाला ज्ञानदेव ॥४॥
ज्ञानदेवें बीज वाढविलें जनीं ।
तेंचि आम्हीं तुम्हीं संपादिलें ॥५॥
म्हणे मुक्ताबाई तिहीं लोकीं ठसा ।
नामदेव ऐसा राहिला कां ॥६॥
अभंग– १२
निवृत्तिदेव म्हणे ऐसें म्हणों नये ।
धन्य भाग्यें पाहे संत आले ॥१॥
आपुलें स्वहित करावें आपण ।
संतांच्या सन्माना चुकों नये ॥२॥
धन्य हो ते नर राहाती पंढरीं श्वान ।
त्यांचे घरीं सुखें व्हावें ॥३॥
नामदेवा संगें देवाचा हो वोढा ।
प्रेमें केला वेडा पांडुरंग ॥४॥
निवृत्ति म्हणे त्यासी न म्हणे आरे ।
तुरे बाई ठेवितां बरें डोई माते ॥५॥
म्हणे मुक्ताबाई घाला लोटांगण ।
आपणां दर्शन नलगे त्याचें ॥६॥
अभंग– १३
कुलालाचे कुंभ भाजल्याविण ।
माती काय आहे संगती पाणियाची ॥१॥
मेणाची ती घेतां करी बरी ।
अनिचे शेजारी राहे कैशी ॥२॥
तैसा अधिरासी काय संतसंग ।
मृगजळा तरंग येतील कैसे ॥३॥
तें आजि नवल देखियेलें डोळां ।
दगड जैसा जळां वेगळेपण ॥४॥
म्हणे मुक्ताबाई जाऊं देऊं नये ।
ऐसें सरिसें काय भांडे करा ॥५॥
अभंग– १४
कुलाल आपल्या घरीं भाजवी भाचरी ।
म्हणे जैं होईल हरि कृपावंत ॥१॥
हरीसि वरदळ लावितो निशिदिनीं ।
धाडिला म्हणोनि तुम्हांपाशीं ॥२॥
तुम्ही संतजन उद्धराल तत्काळ
नामा लडिवाळ विठोबाचा ॥३॥
राखायें तें ब्रीद करायें पावन ।
धाडा बोलावणें गोरोवाला ॥४॥
म्हणे मुक्ताबाई माजलें कीं कोरें ।
काकाचें उत्तर सत्य मानूं ॥५॥
अभंग– १५
गोरा जुनाट मैं जुर्ने हात ।
थापटणें अनुभवाचें ॥१॥
परब्रह्म म्हातारा निवाला अंतरीं ।
वैराग्याचे वरी पाल्हाळला ॥२॥
सोहं शब्द विरक्ति डवरली आंतरीं ।
पाहातां आंवरी अनुभव ॥३॥
म्हणे मुक्ताबाई घालू द्या लोटांगण ।
जाऊं द्या शरण अव्यक्तासी ॥४॥
अभंग– १६
मोतियांचा चुरा फेंकिला अंबरीं ।
विजुचिया परी कीळ जालें ॥१॥
जरी पितांबरें नेसविलीं नमा ।
चैतन्याचा गाभा नीळबिंदू ॥२॥
तळीपरि पसरली शून्याकार जाली ।
सर्पाचिये पिली नाचूं लागे ॥३॥
कडकडोनि वीज निमाली ठायिचे ठायीं ।
भेटली मुक्ताबाई गोरोबाला ॥४॥
ज्ञानदेव म्हणे कैसी जाली भेट ।
ओळखिलें अविट आपण ॥५॥
अभंग– १७
निवृत्तिदेव म्हणे चला गुंफेमधीं ।
अचळ हे आदि समाधी असे ॥१॥
सद्गुरुप्रसादें बोधिली नेटकी ।
गुहे गौप्य ताटी आड केलीं ॥२॥
दंड चक्राकार बांधिली चौकुन ।
आंत संतजन करिती वास ॥३॥
ऐसे गुफेमध्यें नाहीं नामदेव ।
म्हणुनि माझा जीव थोडा होतो ॥४॥
गैनीची मिरास घेतला प्रमाण ।
पूर्वभूमि जतन करित आस ॥५॥
निवृत्तिदेव म्हणे मुक्ताबाईच्या उत्तरें ।
भाजलें कीं कोरें कळों येईल ॥६॥
अभंग– १८
परस्परें गुह्य करिती भाषण म्हणती ।
महाधन गांवा आला ॥१॥
रक्त श्वेत पीत नीळ वर्णाकार ।
नक्षत्रांची वर पूजा केली ॥२॥
प्रकाशमय तत्त्व ज्योतिर्मय पहाणें ।
दीप त्रिभुवनीं एक जाला ॥३॥
निवृत्तिदेव म्हणे कुलालाचे चक्र ।
अंतर बाहेर एक ऐसें जालें ॥४॥
अभंग– १९
हांसोनि सोपानें खुणाविल्या खुणा ।
नामदेव पाहुणा आला असे ॥१॥
तयासी हो पाक पाहिजे पवित्र ।
भाजलें कीं कोरें कळों नेदी ॥२॥
मुक्तिकेचे पारखी तुम्ही आहां देवा ।
भाजुनि जीवा शिवा ब्रह्म करा ॥३॥
आनंदें लती करावरी कर नेणों ।
राहिलें करें कोण्या गुणें ॥४॥
निर्गुणापासोनी सगुणाची संगती नाहीं ।
स्वरूपस्थिति अंगा आली ॥५॥
म्हणे मुक्ताबाई हेरोनियां हेरा ।
हिरा किंवा गारा नेण बापा ॥६॥
अभंग– २०
जव्हारियाचे पुढें मांडियलें रत्न ।
आतां मोला उणें येईल कैसें ॥१॥
तैसें थापटणें पारखियाचा हात ।
वाफ जाल्या घात वायां जाती ॥२॥
प्रथम थापटणें निवृत्तीच्या माथा ।
डेरा जाला निका परब्रह्म ॥३॥
तेंचि थापटणे ज्ञानेश्वरावर ।
आतां कैचें कोरें में येथें ॥४॥
तेचि थापटणे सोपानाचे डोई ।
यांत लेश नाही कोरें कोठें ॥५॥
तेंचि थापटणें मुक्ताबाईला हाणी ।
अमृत संजिवनी उतुं आली ॥६॥
तेंचि थापटणें नामदेवावर होईचो ।
मोहरे रहाँ लागे |७॥
गोरा म्हणे कोरा राहिला गे ।
बाई सुन्नेभरि नाहीं भाजीयेला ॥८॥
अभंग– २१
संतसमागम फळला रे आला ।
सन्मानाचा जाला लाभ मोठा ॥१॥
अतीथि आदर केला मुक्ताबाई ।
लांकडानें डोई फोडिली माझी ॥२॥
देवाने गोंधळ घातला गरुडपारी ।
भिजली पितांबरी अश्रुपातीं ॥३॥
माझें माझें म्हणोनि गाईलें गान्हाणें ।
कळलें संतपण हेंचि तुमचें ॥४॥
भरी भरोनियां आलों तुम्हां जवळी ।
कैकाड मंडळी ठावी नोव्हे ॥५॥
नामा म्हणे सन्मान पावलों भरून ।
करितां गमन बरें दिसे ॥६॥
अभंग– २२
उद्विग्न मनीं करी दीर्घ ध्वनी ।
नाहीं माझें कोणी सखे ऐसें ॥१॥
वैराग्य कसवटी सोसवेना घाये ।
पळावया पाये मार्ग काढी॥२॥
जाले चाळाचूळ मनांत चंचळ ।
युगा ऐसें पळ वाटतसे ॥३॥
नामा म्हणे जावें पळोनियां ।
आतां संतसंग होतां भाजतील ॥४॥
म्हणे मुक्ताबाई चैतन्याचा ।
कर ब्रह्म अधीवर चेतवावा॥५॥
अभंग– २३
अंतर बाहेर भाजू आम्ही ।
कुंभ भनिरालंय सगळेची ॥१॥
अहं सोहं उर्ध्व लाउनी फुंकणी ।
नेत्रद्वारे फुंकुनी जाळ करूं ॥२॥
जीवित्व काढूनि शिव घडूं ।
अंगा प्रिय पांडुरंगा आवडेल ॥३॥
म्हणे मुक्ताबाई पळायाचें पाही ।
आसन स्थिर नाहीं नामयाचें ॥४॥
अभंग– २४
न पुसतां संता निघाला तेथुनी ।
पैलपार इंद्रायणी प्राप्त झाला ॥१॥
मागे पुढे पाहे पळतो तातडी ।
आला उडाउडी पंढरीसी ॥१॥
कवळोनी कंठी विठ्ठल हे मूर्ती ।
नको देऊ हाती निवृत्तीच्या ॥४॥
मुक्ताबाईने तेथे माजविली कली ।
हे संत मंडळी कपटी तुझी ॥५॥
नामा म्हणे देवा आणिले पूर्व देवें ।
गेलो असतो जायें सगळाची ॥६॥
अभंग– २५
पूर्वी केली सेवा उपयोगा ।
आली देवा दिले असते ।
जिवा आहूती लागी ॥१॥
अनंत जन्मीचे फळले ।
अनुष्ठान पाहिले चरण ।
विठोबाचे ॥२॥
न जाणो माझ्या ।
येतील पाठोपाठी घालतिल ।
मीठी भिडे तुला ॥३॥
त्यासी द्याल तुम्ही ।
अगत्य उदारा ।
मज कां न ।
मारा आपुले हाते ॥४॥
नामा म्हणे तुझे ।
न सोडी चरण युगा युगी ।
धरणे घेतले असे ॥५॥
अभंग– २६
हातांत नरोटी जीर्णाचे ते ।
भार म्हणसी सौदागर संत माझे ॥१॥
परळ भोपळ्याची गृहामाजी संपत्ती ।
तुम्ही का श्रीपति भूषण सांगा ॥२॥
भणंगाचे घरा नित्यची राजपट ।
सांगसी अचाट ब्रीद त्यांचे ॥३॥
कैकाड्याचे वाणी करिती गूडगूड ।
मजला हे गूढ समजेना ॥४॥
नामा म्हणे गाती प्रकाशाचे ।
गाणे आम्हां अोवादितसे॥५॥
अभंग– २७
म्हणती घेतल्या आम्ही धान्य कोडी । खर्चायला कवडी धार नसें ॥१॥
हांसती रडती पडती एकमेकांवर ।
आनंदाला पार नाही म्हणती ॥२॥
काय गुणे देव रिझाला त्यावरी ।
मेसाचा फटकुरी जन्म गेला ॥३॥
पाहोन दारिद्र्य झालो कांसाविस ।
केवळ परीस पांडुरंगा ॥४॥
लहानसी मुक्ताई जैसी सनकाडी ।
केले देशोधडी महान संत ॥५॥
सगळेची काखेसी घेईन म्हणे ब्रह्मांड ।
नामा म्हणे पाखंड दिसते मज ॥६॥
अभंग– २८
पांचा सातांचा एका जागी मेळ।
केवळ चांडाळ दुर्बुद्धि ते ॥१॥
जातांनाच माझी केली विटंबना ।
म्हणोनी नारायणा मागे आलो ॥२॥ पाहिला तयांचा मानस आदर ।
जमा केला कर जाळावया ॥
त्यांच्या धाके मागे आलोरे अनंता ।
येत तुझ्या चित्ता बरे त्यांचे ॥४॥
नामा म्हणे जिवे आलो वाचवोनी ।
अजुनी तरी चक्रपाणी वांचवी मज ॥५॥
अभंग– २९
आहे त्यांचे मनी करावे आगमन ।
घेतील मागून तुजपाशी ॥१॥
तयेवेळी व्हाल तुम्ही बेईमान
तुम्ही द्याल काढून संतापाशी ॥२॥
खादल्या पिदल्याचे राखे वा ।
गुमान तुला माझी आण पांडुरंगा ॥३॥
चालविला लळा पुरविली आवड ।
आता कां दगड जड झालो ॥४॥
कां माझी चिंता सांडिली अनंता ।
संता लागी देता हरूष वाटे ॥५॥
नामा म्हणे काय करिसी अमंगळ ।
अडचणी राउळा माजी झाली ॥६॥
अभंग– ३०
वटारोनी डोळे पाहती आभास ।
मज त्याचा भास कळों नेदी ॥१॥
भाजा भाजा म्हणोनी उठली ।
एकसरां मग म्या बाहेरा गमन केले॥२॥
आता याजवरी द्याल त्यांचे हाती ।
होऊ पाहती माती जीवित्वाची ॥३॥
अभयाचे दान द्यावे या श्रीहरी ।
दुर्बल बाहेरी घालु नये ॥४॥
समर्थ लांच्छन लागले नावांचे न ।
जाणो देवाचे असेल कांही ॥५॥
नामा म्हणे नांव पतीत पावन ते ।
या बोला उणे आणू नये ॥६॥
अभंग– ३१
संतासी विन्मुख झाला जो गव्हार ।
नाही आता थार इहपरलोकी ॥१॥
नाही कळला वेड्या संतांचा अंगवा ।
झोप वैसली डोळा अज्ञानाची ॥२॥
प्रांतीने तुझी पुरविली पाठी ।
सज्जनाच्या गोष्टी कड़ झाल्या ॥३॥
हाता आला लाभ गमविला सारा ।
भुललासी गव्हारा भ्रमभूली ॥४॥
मोह सर्पे तुझे व्यापियले अंग ।
म्हणे पांडुरंग काय आतां ॥५॥
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने