संत मुक्ताई अभंग गाथा
संत मुक्ताबाई – ओव्या
ओवी– १
पहिली माझी ओवी ।
परतून पाहिले दृष्टीने ।
देखिले निजरूप ॥१॥
दुसरी माझी ओवी ।
जे नाही मनी ।
लक्ष तुझे चरणी ।
लागीयेले ॥२॥
तीसरी माझी ओवी ।
लाभे सायुज्यता ।
हात तुझा माझा ।
सद्गुरुनाथा॥३॥
चवथी माझी ओवी ।
शून्य जेथे आटे वस्तु
घनदाट मागेपूढे ॥४॥
पाचवी माझी ओवी ।
पाचही अणुआरांचा ।
पंचवीसीयांचा ।
रीघ नाही ॥५॥
साहवी माझी ओवी ।
सादृश्य देखणे ।
वरकड बोलणे ।
फोल झाले ॥६॥
सातवी माझी ओवी ।
साच वाटे मना ।
अंतरीच्या खुणा ।
काय सांगो ॥७॥
आठवी माझी ओवी ।
आठव नाही जरा ।
निर्गुण सोयरा ।
पर्णियेला ॥८॥
नववी माझी ओवी ।
नांदू मी लागले ।
परपुरुषा रतले ।
जीवेभावे ॥९॥
दहावी माझी ।
ओवी धाले माजे ।
मन डोळां दिसे ऊन ।
रात्रीमाजी ॥१०॥
म्हणे बाई निवृत्तीचे ।
देणे योगीवाचे खुणे ।
योगी जाणे ॥११॥
परतून पाहिले दृष्टीने ।
देखिले निजरूप ॥१॥
दुसरी माझी ओवी ।
जे नाही मनी ।
लक्ष तुझे चरणी ।
लागीयेले ॥२॥
तीसरी माझी ओवी ।
लाभे सायुज्यता ।
हात तुझा माझा ।
सद्गुरुनाथा॥३॥
चवथी माझी ओवी ।
शून्य जेथे आटे वस्तु
घनदाट मागेपूढे ॥४॥
पाचवी माझी ओवी ।
पाचही अणुआरांचा ।
पंचवीसीयांचा ।
रीघ नाही ॥५॥
साहवी माझी ओवी ।
सादृश्य देखणे ।
वरकड बोलणे ।
फोल झाले ॥६॥
सातवी माझी ओवी ।
साच वाटे मना ।
अंतरीच्या खुणा ।
काय सांगो ॥७॥
आठवी माझी ओवी ।
आठव नाही जरा ।
निर्गुण सोयरा ।
पर्णियेला ॥८॥
नववी माझी ओवी ।
नांदू मी लागले ।
परपुरुषा रतले ।
जीवेभावे ॥९॥
दहावी माझी ।
ओवी धाले माजे ।
मन डोळां दिसे ऊन ।
रात्रीमाजी ॥१०॥
म्हणे बाई निवृत्तीचे ।
देणे योगीवाचे खुणे ।
योगी जाणे ॥११॥
ओवी– २
पहिली माझी ओवी |
प्रात:काळ होता गाईला |
विधाता त्रिकूटीचा ॥१॥
त्रिकुटीचा देव |
आचारक्रिया |
शक्ती स्थूल |
देही वर्तती ।
रक्तप्रभा ॥२॥
क्तप्रभा पृथ्वी |
आउट हात जाण ।
आउट ताळ |
गगन दीसताहे ॥३॥
दीसताहे लिंग गुरू |
तो सूक्षम आंगुष्ठ |
मात्र वर्ण ।
शुभ्र वर्ण ॥४॥
शुभ्रवर्ण आप |
ज्ञानशक्ती पाहे ।
श्रद्धाहीन राहे ।
विष्णुभक्त ॥५॥
भक्तरुद्र तीसरा ।
सिवलिंग कारण ।
द्रव्यशक्ति स्थान ।
तेज तत्व ॥६॥
तेज तत्व पाही |
महाकारण करतो ईश्वर |
करतो सेवा त्याची ॥७॥
सेवात्याची घेतो ।
नीळकंठ ओंकार प्रमाण |
मसूर दीसता हे ॥८॥
दीसताहे लिंग |
अति गौरवर्ण वायोचे |
स्फूरण तयातूनी ॥९॥
तयातूनी वाटे ।
पुण्याद्री पर्वत ।
भ्रमर गुंफानाथ |
पाहावया ॥१०॥
पाहावया जावे ।
प्रसाद लिंगासी ।
विराट निवासी पीतवर्ण ॥११॥
पीतवर्णं पाही कैवल्यधारक |
महत् शक्ति |
देख त्याचे स्थळी ॥१२॥
त्याचे स्थळी |
निवासी पीतवर्ण ॥१३॥
पीतवर्णं पाही |
कैवल्यधारका महत् शक्ति |
देख त्याचे स्थळी ॥१४॥
त्याचे स्थळी |
उमा उक्षित बैसला ।
लक्षातीत जाला ।
अलक्ष तिथे ॥१५॥
दशदिशावेगळा
नित्य निरंजन ।
निःशब्दी हे खूण |
ओळखावी ॥१६॥
निवृत्तीप्रसादे बोले |
मुक्ताबाई अनुभवचे |
डोही स्थिरावली ॥१७॥
प्रात:काळ होता गाईला |
विधाता त्रिकूटीचा ॥१॥
त्रिकुटीचा देव |
आचारक्रिया |
शक्ती स्थूल |
देही वर्तती ।
रक्तप्रभा ॥२॥
क्तप्रभा पृथ्वी |
आउट हात जाण ।
आउट ताळ |
गगन दीसताहे ॥३॥
दीसताहे लिंग गुरू |
तो सूक्षम आंगुष्ठ |
मात्र वर्ण ।
शुभ्र वर्ण ॥४॥
शुभ्रवर्ण आप |
ज्ञानशक्ती पाहे ।
श्रद्धाहीन राहे ।
विष्णुभक्त ॥५॥
भक्तरुद्र तीसरा ।
सिवलिंग कारण ।
द्रव्यशक्ति स्थान ।
तेज तत्व ॥६॥
तेज तत्व पाही |
महाकारण करतो ईश्वर |
करतो सेवा त्याची ॥७॥
सेवात्याची घेतो ।
नीळकंठ ओंकार प्रमाण |
मसूर दीसता हे ॥८॥
दीसताहे लिंग |
अति गौरवर्ण वायोचे |
स्फूरण तयातूनी ॥९॥
तयातूनी वाटे ।
पुण्याद्री पर्वत ।
भ्रमर गुंफानाथ |
पाहावया ॥१०॥
पाहावया जावे ।
प्रसाद लिंगासी ।
विराट निवासी पीतवर्ण ॥११॥
पीतवर्णं पाही कैवल्यधारक |
महत् शक्ति |
देख त्याचे स्थळी ॥१२॥
त्याचे स्थळी |
निवासी पीतवर्ण ॥१३॥
पीतवर्णं पाही |
कैवल्यधारका महत् शक्ति |
देख त्याचे स्थळी ॥१४॥
त्याचे स्थळी |
उमा उक्षित बैसला ।
लक्षातीत जाला ।
अलक्ष तिथे ॥१५॥
दशदिशावेगळा
नित्य निरंजन ।
निःशब्दी हे खूण |
ओळखावी ॥१६॥
निवृत्तीप्रसादे बोले |
मुक्ताबाई अनुभवचे |
डोही स्थिरावली ॥१७॥