संत मुक्ताई अभंग गाथा
सासुरवास
अभंग– १
बाई मी जाते माहेराला |
माझ्या मूळ घराला ॥१॥
माझ्या मुळीचे तीन सासरे |
त्यांत दोन वाईंट आहेत खरे।
एक आहे गरिब बिचारा |
मानित नाही मी त्याला ॥२॥
माझ्या मुळीचे सहा दीर |
काय सांगू मी त्यांचा कुविचार |
काम क्रोध मद मत्सर गर्व अहंकार।
गांजिती मजला ॥३॥
आशा मनशा इच्छा कल्पनेने |
घात केला या चौघीजनीने वासना |
नंदुली मोठी चावटुली धरि|
गाल गुच्या गाला ॥४॥
माया सासू मोठी |
धांगडी हिला प्रपंचाची |
गोडी येता जाता |
थापडी मारिती गालाला ॥५॥
मोठ्या हौसेने पति |
म्या केला जाऊनी राहीली |
त्यांच्या घराला परी तो उगा |
मौनचि ठेला बोलत नाही मजला ॥६॥
ऐसी मुक्ताई गांजिली या |
साधु संतांसी शरण |
गेली जाऊनी तेथेची |
राहिली मुळ स्वरुपाला ॥७॥
माझ्या मूळ घराला ॥१॥
माझ्या मुळीचे तीन सासरे |
त्यांत दोन वाईंट आहेत खरे।
एक आहे गरिब बिचारा |
मानित नाही मी त्याला ॥२॥
माझ्या मुळीचे सहा दीर |
काय सांगू मी त्यांचा कुविचार |
काम क्रोध मद मत्सर गर्व अहंकार।
गांजिती मजला ॥३॥
आशा मनशा इच्छा कल्पनेने |
घात केला या चौघीजनीने वासना |
नंदुली मोठी चावटुली धरि|
गाल गुच्या गाला ॥४॥
माया सासू मोठी |
धांगडी हिला प्रपंचाची |
गोडी येता जाता |
थापडी मारिती गालाला ॥५॥
मोठ्या हौसेने पति |
म्या केला जाऊनी राहीली |
त्यांच्या घराला परी तो उगा |
मौनचि ठेला बोलत नाही मजला ॥६॥
ऐसी मुक्ताई गांजिली या |
साधु संतांसी शरण |
गेली जाऊनी तेथेची |
राहिली मुळ स्वरुपाला ॥७॥
अभंग– २
उबगले संसारा मजला ।
कोणी माहेरासी न्यावो ।
चुकवा एवढा जाच तुमच्या ।
पडते पाया वो ॥धृ॥
प्रपंच हा सासरा ।
मजला उगाची गांजितो ।
भेद भयंकर भाव ।
हा तर मजला ।
उगाचि जाळीतो ॥२॥
सासु ही कल्पना मजला ।
जाच करिते नाना ।
अविद्या ही तर ननंद ।
माझी उगीच राहीना ॥३॥
क्रोध माझा दीर मजला ।
भलतेचि बोलितो काम ।
माझा दादला मजला ।
भलती कडे नेतो ॥१४॥
आशा ममता जावा यानि।
मांडियेली ना कुठवर ।
सोस जाच हा तर ।
कदापि राहवेना ॥५॥
जो माझे बाहेर दाखविल ।
त्यासी देह समर्पिन ।
म्हणे मुक्ताबाई गेली ।
माझी लज्जा उडान ॥६॥
कोणी माहेरासी न्यावो ।
चुकवा एवढा जाच तुमच्या ।
पडते पाया वो ॥धृ॥
प्रपंच हा सासरा ।
मजला उगाची गांजितो ।
भेद भयंकर भाव ।
हा तर मजला ।
उगाचि जाळीतो ॥२॥
सासु ही कल्पना मजला ।
जाच करिते नाना ।
अविद्या ही तर ननंद ।
माझी उगीच राहीना ॥३॥
क्रोध माझा दीर मजला ।
भलतेचि बोलितो काम ।
माझा दादला मजला ।
भलती कडे नेतो ॥१४॥
आशा ममता जावा यानि।
मांडियेली ना कुठवर ।
सोस जाच हा तर ।
कदापि राहवेना ॥५॥
जो माझे बाहेर दाखविल ।
त्यासी देह समर्पिन ।
म्हणे मुक्ताबाई गेली ।
माझी लज्जा उडान ॥६॥