संत मुक्ताबाई अभंग – श्री ज्ञानेश्वरमहाराजांची मुक्ताबाईस सनद

संत मुक्ताबाई अभंग – श्री ज्ञानेश्वरमहाराजांची मुक्ताबाईस सनद

संत मुक्ताई अभंग गाथा

संत मुक्ताबाई अभंग – श्री ज्ञानेश्वरमहाराजांची मुक्ताबाईस सनद

अभंग– १
आदिनाथ शंकर गौरी मनोहर ।
खूण ही साचार मच्छिंद्रनाथ ॥१॥
मच्छिद्रे गोरक्षा सांगितले गुज ।
ते मैनीनार्थे मजे उपदेशिले ॥२॥
तेथूनी तारक निवृत्ती आम्हासी ।
जाणा त्रिवर्गासी उद्धरिले ॥३॥
अभंग– २
ते नयनाचे अग्री पहावे आपण
उजळिल्या जाण दाहि दिशा ॥१॥
ब्रह्मांडा एवढे ओतीव सगळे ।
मन बुद्धी कले ऐसे नाही ॥२॥
निवृत्ति प्रसादे ज्ञानदेवा लाधला
मुखाचा झाला तेणें सुखें ॥३॥
अभंग– ३
सत्यज्ञान (अनंत) तेंचि गगनाचे प्रावर्ण ।
नाहीं रूप गुण वर्ण जेथे ॥१॥
तो हा श्रीहारी पाहिला डोळेभरी ।
पाहतां पाहणें दुरी सांडोनिया ॥२॥
वाचेचा उच्चार नवल हे साचार ।
स्वरूप निर्विकार कोंदाटलें ॥३॥
ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निजज्योती ।
ती ही उभी मूर्ती विटेवरी ॥४॥
अभंग– ४
विटेवरी मूर्ति दिसते सगुण सगुण ।
का निर्गुण म्हणू दादा ॥१॥
सगुण जरी म्हणू दिसते निर्गुण ।
वाचेचे भिन्न पडले दादा ॥२॥
वचन बुडाले स्तब्ध झाले मन ।
सगुण निर्गुण दोन्ही नाहीं ॥३॥
म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञानदेवा ।
विचार हा बरवा करूनिया ॥४॥
अभंग– ५
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई
सांगेन तू पाही गुरुमुखें ॥१॥
निगुर्णाचा बुंद सगुणी उतरला ।
कर्दम तो झाला एकाएकी ॥२॥
स्थापिलासे गोळा सगुणाचा सार ।
तयाचा आधार एक आहे ॥३॥
मूळद्वारी मूळी स्थापिला गणपती
तयापाशी वस्ती निर्गुणाची ॥४॥
निर्गुण म्हणजे काय रेणूते अक्षर
म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई ॥५॥
अभंग– ६
मूळद्वारी दादा स्थापिला ।
गणपती माया ही ।
उत्पत्ती कैशी झाली ॥१॥
मायेचा बंबाळ जाये एकसरा ।
इच्याही आधारा सांगा दादा ॥२॥
ब्रह्मांड व्यापिले आकाश कवळिले ।
सर्व काही व्यापिले मायेनेचि ॥३॥
माया केसी दादा सांगता निर्गुण ।
मुक्ताबाई म्हणे मित्र फोडा ॥४॥
अभंग– ७
रेणु तें निरंजन अणू तेचि ।
माया माया वचनी ।
देह निपजला ॥१॥
नाही अक्षराचा आधार मेरुशीं ।
हे तो नाभीपाशीं स्थापियले ॥२॥
दोही मधोनियां निघाले वचन ।
वेदाचें जन्मस्थान तेंचि बाई ॥३॥
दहा पवनांचा एक झाला मेळा |
रेणूचा जिव्हाळा सर्वांसी हा ॥४॥
सर्वांतुनी वेगळा रेणू तो अचळ ।
म्हणे ज्ञानेश्वर मुक्ताबाई ॥५॥
अभंग– ८
सर्वांतुनी वेगळा हाती कैसा येई |
म्हणे मुक्ताबाई सांगा दादा ॥१॥
दहा पवनांचा खेळ योगी खेळती ।
ओडोनियां नेती ब्रह्मांडांत ॥२॥
कुंडलिनी निवटोनि करिती आकर्षण |
रेणूचे दर्शन झाले कीं नाहीं ॥३॥
म्हणे मुक्ताबाई सांगा ज्ञानेश्वरा ।
चुके येरझारा चौन्यांशीव्या ॥४॥
अभंग– ९
कुंडलिनी निवटोनी कोंडिती पवन ।
त्या रेणूचें दर्शन घडलें नाही ॥१॥
न लगे आसन कोंडिती पवन ।
करावे साधन गुरुकृपे ॥२॥
गुरुकृपेवीण न ये तो हातासी ।
पाहतां रेणूसी अंत नाहीं ॥३॥
ब्रह्मांडी रेणू नावे सदोदित |
सोहं त्याचा आंत जात असे ॥४॥
दहा पवना वेगळा सोहं तो अचळ ।
रेणु त्याचा खेळ सदोदीत ॥५॥
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई ।
गुरुकृपे सोई कळो येई ॥६॥
अभंग– १०
गुरुकृपा झाली प्रत्ययासी आली |
कैशी ती कळली सांगा दादा ॥१॥
लेखा नाही आला साधन करितां ।
तो कैसा येईल हाता सांगा दादा ॥२॥
व्यास तो वाल्मिक वर्णिती अपार ।
तयांसी हा पार कळला नाहीं ॥३॥
वेदासी ना कळे, श्रुति ।
बेडावले तो कैसेनि येईल ।
हाता सांग दादा ॥४॥
इंद्रियां वेगला, मन बुद्धि निराळा ।
सर्वांत व्यापिला कळे कैसा ॥५॥
मुक्ताबाई म्हणे कैसे ज्ञानराजा ।
संदेह हा माजा फेडोनिया ॥६॥
अभंग– ११
गुरुकृपा कैशी सांगतो तुजला ।
पूर्ण दिवशी झाला चंद्र गुप्त ॥१॥
तैसा प्राणी होता मायेमाजी भ्रांत ।
वीजेचा अवचित उदयो झाला ॥२॥
दिवसेंदिवस कळा चढे त्या ।
चंद्राला पूर्णतेसी आला पूर्णिमेला ॥३॥
अभंग– १२
तैसा प्राणी होता मायेमाजी प्रांत ।
भेटला अवचित गुरुराज ॥१४॥
केली त्यांनी दया हरपली माया ।
मूलिंचिया ठाया बैसविले ॥५॥
म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई ।
गुरुकृपा बाई, ऐसी आहे ॥६॥
अभंग– १३
पूर्णिमेचें दिवश चंद्र झाला अस्त ।
देहाचीही गत तैशी होई ॥१॥
कर्ण बंद होती नेत्र आच्छादिती ।
मग कैशी गती होय दादा ॥२॥
देह झाला विकळ जिव्हां ते खुंटली
दश पवना झाली हडबड दादा ॥३॥
तेथे कोण का सद्गुरूने दिल्ली ।
देहासी कैसी झाली मोती ॥४॥
म्हणे मुक्ताबाई फेडावे हे भिन्न ।
कोणते साधन करूं दादा ॥५॥
अभंग– १४
देहा मोक्ष होम साधन ते ऐका ।
मायेसी संकल्प करी बाई ॥१॥
बाळे, वज्रासन करोनिया मनन ।
कराये हे ध्यान सद्गुरुंचे ॥२॥
ॐ सोचि गुरु सोहं तोचि शिया या
दोहींचा लाभव करी भाई ॥३|
नासाग्री दृष्टि सोहंगासी गोष्टीं रेनू ।
पाठी पोटी भरला बाई ॥४॥
सच्चिदानंद भरला आहे महान्य ।
तयामाजी लीन होणे बाई॥५॥
लीन झाले म्हणजे नाहीं आपपर ।
म्हणे ज्ञानेश्वर पूर्ण कृपा ॥६॥
अभंग– १५
कृपा झाली आता आली प्रत्ययासी कैसे या मनास करूं दादा ॥१॥
कैसे वज्रासन कैसे ते मनन इंद्रियांसी दमन कैसे करूं ॥२॥
कैसे करूं दादा सोहंगासी गोष्टी नासाग्री दृष्टि कैसी ठेवूं ॥३॥
रेणुमध्ये मिळे कैसी ज्ञानेश्वरा सांगा या विचारा कृपा करुनि ॥४॥
धाकुटे भावंड घेतलीसे आळ मुक्ताबाई लडिवाळ तुमची दादा ॥५॥
अभंग– १६
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्काबाई ।
सद्गुरुंचे पायी मन ठेवी ॥१॥
करी निजध्यास सोहंगाचा बाई ।
इंद्रियांसी नाही रीघ तेथे ॥२॥
सात हे आंत आठव्याच्या पोटी ।
नवव्या संगे गोष्टी करी बाई ॥३॥
मग दहावा सहज नवयासी भेटला ।
अकराव्यासी सांगू लागला गुजगोष्टी ॥४॥
करुनि उपोषण मूळद्वार जोन ।
लिंगस्थानी चरण ठेवी बाई ॥५॥
ब्रह्मांडातुन ओवा सोहंग ।
त्रिवेणी आसन घाली बाई ॥६॥
ॐ तोचि गुरु सोहं तोचि शिव या
दोहींचा लाघव करी वो बाई ॥७॥
ऐक्य झाल्यावरीं उठेल बाळा ।
कोटी सूर्यकळा प्रकाशल्या ॥८॥
खेचरी हे मुद्रा नासाग्री दृष्टी स्वयंभू ।
पाठी पोटी भरला बाई ॥९॥
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई या ।
परता नाही उपदेश आता ॥१०॥
अभंग– १७
सहज समाधी लागली निर्गुणी ।
खुंटलीसे वाणी न चले पुढे ॥१॥
खुंटला हा शब्द राहिला व्यवहार ।
झाला साक्षात्कार सदोदित ॥२॥
गळाली इंद्रिये राहिलेसे मन ।
झाले महाशून्य एका एकी ॥३॥
विरालीसे शक्ती झालीसे निवृत्ति ।
झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई ॥४॥
म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई ।
उपडी समाधी घेई जगा माजी ॥५॥
अभंग– १८
आठवे समाधीचे अंग आले तुज ।
आता नाही काज आणिकांसी ॥१॥
हेचि गुहाज्ञान पार्वतीसी दिले ।
मच्छिंद्रा लाधले हेंचि ज्ञान ॥२॥
मच्छिंद्राने दिले गोरक्षाचें हातीं ।
तेंचि चौरंगी प्रती उपदेशिले ॥३॥
चौरंगीने दिले भर्तरीचे हाती ।
तेणे गैनीप्रती उपदेशिले ॥४॥
बाप रुक्मादेवी निवृत्ति दयाळा ।
त्यांनीच आपणांसी उद्धरिले ॥५॥
ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई ।
निवृत्तींचे पावी सर्व सुख ॥६॥
अभंग– १९
हेंचि गुह्यज्ञान नामदेवा लाधलें ।
कबिरानें कथिले चार युगी ॥१॥
तेंचि गुह्यगोष्टी सांगितली तुजा ।
विश्वासाचें बीज विटेवरी ॥२॥
गुरुपुत्र जाणती योगी सदा ध्याती ।
शिवादिक जपती हेंचि ध्यान ॥३॥
अठरा अभंगांची करोनी सनद ।
ठेवावी निबंध आपणां पायी ॥४॥
याचे पुढे ज्ञान सांगती पाखांडा ।
जळो बाई तोंड काळे त्यांचे ॥५॥
अंतकाळ समयी तीन दिवस उपोषण ।
सायुज्यता जाण मुळीं होय ॥६॥
आतां हेचि गोष्टी न करी प्रकट ।
ठेवावी हे गुप्त आपणापाशीं ॥७॥
प्रगट करितां होय मात्रागमन ।
ज्ञानदेव म्हणे आण निवृतीची ॥८॥
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने