हिंदू धर्मात एकादशी व्रताला अत्यंत पवित्र मानले जाते. आषाढ महिन्याच्या कृष्ण पक्षातील कामिका एकादशीला विशेष महत्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केल्यास सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्षप्राप्ती होते.
कामिका एकादशीची कथा
एका गावात एक वीर क्षत्रिय राहत होता. त्याचे एका ब्राह्मणाशी वाद झाला आणि दुर्दैवाने त्या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. क्षत्रियाला पश्चात्ताप झाला आणि त्याने त्या ब्राह्मणाचा अंत्यविधी करण्याची इच्छा व्यक्त केली. पण इतर ब्राह्मणांनी त्याला परवानगी नाकारली आणि ब्रह्महत्येचा दोष सांगितला.
त्याने प्रायश्चित्त विचारल्यावर ब्राह्मण म्हणाले की, आषाढ कृष्ण एकादशीला भक्तिपूर्वक व्रत करून, भगवान विष्णूचे पूजन कर आणि अन्नदान, दक्षिणा दे. याने तू पापमुक्त होशील. क्षत्रियाने पूर्ण श्रद्धेने व्रत केले आणि त्या रात्री भगवान विष्णूने दर्शन देऊन त्याला मुक्ती दिली.
कामिका एकादशीचे महत्त्व
- ब्रह्मदेवांनी नारदांना या व्रताचे महत्व सांगितले आहे.
- तुळशीचे पूजन व अर्पण केल्यास सर्व पापांचा नाश होतो.
- रात्री दिवा लावल्यास पितरांना स्वर्गात अमृत प्राप्त होते.
- या व्रतामुळे मनुष्य जन्माचे सार्थक होते.
व्रत विधी
- सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
- भगवान विष्णूंना जल व पंचामृत स्नान घालावे.
- गंध, फुले, धूप, दीप, तुळस अर्पण करून पूजा करावी.
- लोणी व खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा.
- विष्णू सहस्त्रनाम जप करावा व प्रसाद वाटावा.
- उपवास ठेवावा किंवा फलाहार घ्यावा.
विशेष उपाय व मंत्र
स्त्रियांनी तुळशीची पूजा करून तुपाचा दिवा लावावा आणि खालील मंत्र म्हणावा:
महाप्रसाद जननी, सर्व सौभाग्यवर्धिनी
आधि व्याधि हरा नित्यं, तुलसी त्वं नमोस्तुते।।
कामिका एकादशीला काय करावे आणि काय टाळावे
- एकादशी व सोमवारी नारळ फोडू नये.
- गाय दाराशी आली तर तिला गूळ, पोळी द्यावी.
- शिळं अन्न मुक्या प्राण्यांना द्यावं – हे पंचमहायज्ञाचं पुण्य आहे.
- तहानलेल्या व्यक्तींना व प्राण्यांना पाणी द्यावं.
- अंध, वृद्ध, आजारी लोकांना मदत करावी – याने पुण्य मिळतं.
- संध्याकाळी झाडू, मीठ, पैसे, नारळ, दूध देऊ नये.
- घरात कलश आणि दीपक देवाजवळ ठेवावं.
- एकत्र कुटुंबपद्धती जपा – लक्ष्मीचा वास टिकतो.
- सकाळी लवकर उठून घर स्वच्छ ठेवावं व देवपूजा करावी.
- स्त्री-पुरुषांनी काम चटपट करण्याची सवय ठेवावी – याने शांती राहते.
या दिवशी नियमांचे पालन केल्यास नक्कीच लक्ष्मीप्राप्ती, सुख-शांती आणि मोक्ष प्राप्त होतो. कामिका एकादशी म्हणजे आत्मशुद्धी, कर्तव्यनिष्ठा आणि ईश्वरभक्तीचा संगम!
॥ श्री विष्णवे नमः ॥
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा