वारी प्रश्नमंजुषा - संत व वारकरी परंपरेवरील सुंदर माहिती

Share This
vari prashnmnjusha
vari prashna manjusha

आषाढीवारी प्रश्नमंजुषा

राम कृष्ण हरी

पांडुरंगाच्या कृपेने, आम्ही संत तुकाराम आणि संत ज्ञांनेश्वर महराज पालखी सोहळा सुरू झाल्यापासून वारी प्रश्नमंजुषा ही छोटीशी ज्ञानयात्रा Instagram आणि Facebook वर सुरू केली होती. यात तुमच्यासारख्या वारीप्रेमी आणि संत साहित्याशी निष्ठा असलेल्या भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाला. त्या सर्व प्रश्नोत्तरांचे हे संकलन – आषाढीवारी प्रश्नमंजुषा!

तुम्ही मनापासून सहभाग घेतलात, तुमचं सहकार्य हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा होती. त्यामुळे तुमच्याप्रती आम्ही मन:पूर्वक आभार मानतो.

वारी, संतपरंपरा आणि भक्तीसंवेदना या विषयांना स्पर्श करून हे प्रश्न पुढे सगळ्यांपर्यंत पोहोचावेत, यासाठी हा छोटासा प्रयत्न... ही प्रश्नमंजुषा तुम्हाला कशी वाटली हे जरूर कॉमेंटद्वारे कळवा.

राम कृष्ण हरी

1. संत तुकाराम महाराज यांची पालखी कोठून निघते ?
उत्तर - देहु
2. पंढरपूर हे शहर कोणत्या नदी किनार्‍यावर वसले आहे ?
उत्तर - चंद्रभागा
3. संत एकनाथ महराज यांची जन्मभूमी कोणती ?
उत्तर - पैठण
4. संत तुकाराम महाराज यांनी कोणत्या भाषेत अभंग रचले ?
उत्तर - मराठी
5. वारकरी संप्रदायतील कोणती संत स्वताला " नामायाची दासी" म्हणून संबोधते ?
उत्तर - संत जनाबाई
6. संत तुकाराम महाराज यांचे गुरु कोण होते ?
उत्तर - बाबाजी चैतन्य
7. कोणत्या भक्ताच्या भक्ति मुळे विठु माऊली युगे अठ्ठावीस विटे वरी उभा होता ?
उत्तर - भक्त पुंडलिक
8. एका वैशेची मुलगी भक्ति करून धन्य झाली______देवाने मंदिरात जागा दिली.
उत्तर - कान्होपत्रा
9. सुमारे 250 वर्षापूर्वी संत ज्ञांनेश्वर महाराज यांची समाधी कोणी शोधून काढली ?
उत्तर - संत एकनाथ
10. वैकुंठगमनाच्या वेळी संत तुकाराम महाराज कोणत्या झाडाखाली बसले होते ?
उत्तर - नांदुरकी
11. संत तुकाराम कोणत्या डोंगराव जाऊन ध्यान आणि अभंग नामस्मरण करायचे ?
उत्तर - भंडारा डोंगर
12. आळंदी हे गाव कोणत्या नदी किनारी वसलेले आहे ?
उत्तर - इंद्रायणी
13. आळंदी हे गाव पुण्य भूमी ठाव दैवताचे नाव _____ ?
उत्तर - सिद्धेश्वर
15. संत सोपानदेव यांची समधी कुठे आहे ?
उत्तर - सासवड
16. संत निवृत्तींनाथ यांचे समाधीस्थळ कोठे आहे ?
उत्तर - त्र्यंबकेश्ववर
17. संत तुकाराम महाराज यांच्या वडिलांचे नाव काय आहे ?
उत्तर - बोल्होबा
18. संत नामदेव महराज यांच्या जन्म कोणत्या गावात झाला ?
उत्तर - नरसी बामनी
19. "जाता पंढरीसी सुख वाटे जीवा" हा प्रसिद्ध अभंग कोणत्या संतांनी लिहला आहे ?
उत्तर - संत सेना महाराज

४ टिप्पण्या: