श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ५

Shri Samarth Dhondu Tatya Maharaj

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांचे जीवन चरित्र भाग ४

।। श्री गणेशाय नमः ।।

२५. जीवंत समाधीचा विचार

श्री समर्थ तात्यांनी आपण जीवंत समाधी अर्थात संजीवन माधी घेण्याचा विचार करुन विराळ येथील मठाच्या प्रांगणामध्ये व्यभागी विवराप्रमाणे छोटेसे भुयार निर्माण करुन ती जागा अवस्थित बांधून घेऊन समाधिस्थल तयार केले आणि आंत ण्यासाठी एक छोटेसे द्वार (खिडकी) ठेवले. समाधिस्थली दिर बांधले व तीन फूट उंचीची आणि दीड फूट रुंदीची श्री बात्रयाची मूर्ती आणली. त्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी आचारसंपन्न वैदिक बहण मंडळीना पाचारण करुन त्यांच्याकडून होम हवन करुन धीपूर्वक त्या मंदिरामध्ये समाधिस्थलाच्या वरच्या बाजूला दत्तात्रयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना इ.स. १९१८ (शके १८४०) ली केली. अर्थात् जीवंत समाधी घेण्याचे ठरवूनच श्री तात्यांनी योजना आखलेली होती.

२६. सूर्योपासक का दत्तोपासक ?

श्री समर्थ तात्या नियमाने सूर्याची आराधना करतात, सूर्यास दुर्वा वाहतात आणि सूर्यनमस्कार घालतात. असे असूनही त्यांनी सूर्य देवतेची प्रतिष्ठापना न करता दत्तात्रयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना आपल्या मठामध्ये केली. त्याचे कारण तात्यांचे श्रीगुरु सखाराम महाराज काशीकर यांनी आपल्या जीवनामध्ये श्री क्षेत्र पंढरीची आषाढी पायी वारी सतत ३५ वर्षे केली. त्यांनी देखील नवा लोहा (विठ्ठलवाडी) येथे श्री दत्तात्रयांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केलेली आहे. यावरुन त्यांचे श्रीगुरु देखील दत्तोपासक होते.

त्याच श्रीगुरुंनी आपल्या हाताने रुद्राक्षांची माला तात्यांच्या गळ्यामध्ये घातलेली आहे. म्हणून तात्या रुद्राक्षांच्या माळेचे मणी फिरवत जप करत होते. तसेच स्नानानंतर आपल्या कपाळी चंदनाचा आडवा गंध लावत असत आणि सकाळी व संध्याकाळी संध्या करतेवेळी (गायत्री मंत्राचा जप करतेवेळी) भाळी विभूतीचे आडवे पट्टे व सर्वांगी विभूती चर्च्यून संध्या करीत असत. अर्थात रुद्राक्षांची माला व विभूतीचे पट्टे तात्याचे आवडते लेणे आहेत.

श्री तात्यांची नित्य पंचायतन पूजा होती म्हणजेच त्या पूजेमध्ये मुख्य पांच देव होते. मध्यभागी दत्तात्रयाची मूर्ती, बाजूने सूर्य, गणपती, विठ्ठल आणि श्रीगुरु; असे पांच देव मांडून पूजा करीत होते. पूजेमधील गणपतीची मूर्ती चाळीस तोळे चांदीची आहे व सूर्याच्या चांदीच्या बारा प्रतिमा आहेत.सार अभिप्राय तात्यांच्या पूजेमध्ये श्री दत्तात्रयाची मूर्ती मुख्यस्थानी होती. कारण ब्रम्हा, विष्णु आणि महेश (सृजिता, पाळीता आणि हर्ता) या तिन्ही देवांचा समन्वय एकत्रिकरण या दत्तात्रय देवाचे मूर्तीमध्ये आहे आणि या अवनीतलावर अवतार धारण करुन जड जीवांचा उध्दार आणि मुमुक्षूवर ज्ञानामृताचा वर्षाव करीत विहार करणारे गुरु देव दत्त कोणाला आवडणारे नाहीत ? अर्थात ते सर्वांनाच आवडणार असल्या कारणाने सर्व संतांनी आपल्या अभंगवाणीतून श्री दत्तात्रय महाराजांचे वर्णन केले आहे. म्हणूनच आपल्या श्रीगुरुप्रमाणे श्री तात्यांनी आपल्या मठामध्ये श्री दत्तात्रय देवाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. अर्थात तात्यांनी दत्तमूर्तीची स्थापना केली. दत्तात्रयाचे आवडते भूषण रुद्राक्ष माला व विभूती (भस्म) आपल्या शरीरावर धारण केले. पूजेमध्ये दत्तमूर्ती होती आणि प्रतीवर्षी दत्तजयंतीचा सोहळा थाटाने साजरा करीत होते यावरुन श्री समर्थ धोंडूतात्या महाराज दत्तोपासकही होते.

२७. "तुम्ही इथे मरणार नाही "

श्री समर्थ तात्यांची आवडीने सेवा करणारा कोळनूर गांवचा एक भक्त होता. त्याचे नांव लोभाजी होते. हा लोभाजी सात्विक स्वभावाचा व विनोदी होता. वारकरी सांप्रदयाच्या नियमाने वर्तन करणरा, गळ्यांमध्ये तुळशीची माळ, भाळी गोपीचंदनाचा गंध, दररोज नियमाने भजन, पूजन व ग्रंथ श्रवण करणारा एकनिष्ठ भक्त होता.

श्री तात्यांची खडतर तपश्चर्या व उपासना पाहून तो त्यांचा सेवक बनला. श्री तात्यांनीही त्याचा सात्विक स्वभाव पाहूनच आपली सेवा त्याच्याकडे दिलेली होती. मठाचे बांधकाम चालू असताना एके दिवशी काही भक्तगणांनी सुंदर चौकोनी दगड बैलगाडीने आणून दिले व तात्यांचे दर्शन घेवून परत गेले. तसेच वाकरड गावच्या एका भक्ताने तर एक सुंदर छन्नीने घोळलेला दगड डोक्यावर ठेवून आलेले या लोभाजीने पाहिले व श्री तात्या ज्या वेळी त्यांच्याकडे श्मश्रु करण्यासाठी बसले तेंव्हा तो न्हावी म्हणाला, "तात्याजी तुम्ही हे भरपूर बांधकाम करत आहात आणि जीवंतपणी समाधी बांधून मरणाची सर्व तयारी अगोदरच करता, परंतु "तुम्ही इथे मरणार नाही." तुमचे मरणाचे ठिकाण दुसरीकडेच आहे. आपल्याला दक्षिण दिशेला जावे लागणार तेव्हा इथे बांधकामाचा एवढा सायास कशाला करता ?" असे बोलत त्याने श्री तात्यांची श्मश्रु केली. या न्हाव्याच्या बोलण्यातील अभिप्राय असा की मनुष्याच्या जीवनाचा अंत मृत्यूने होतो. तो मृत्यू केव्हा येईल आणि कोठे बेईल ? हे काही सांगता येत नाही. त्या मृत्यू पुरुषाचे, त्या काल पुरुषाचे वास्तव्य स्थान दक्षिण दिशेला आहे. अर्थात मृत्यू आल्यानंतरच मरावे लागणार ! असा त्यांचा बोलण्यातील अभिप्राय होता.

खरोखरच पुढे चालून या न्हावी भक्ताचे वचन देवाने सार्थ केले. त्याने दक्षिण दिशेच्या मृत्यूपुरुषाविषयी बोललेली दक्षिण दिशाच तात्यांच्या रहिवासासाठी परमेश्वराने ठरविली. असे म्हटले तर त्यात काही वावगे होणार नाही. कारण विराळगावच्या दक्षिण दिशेला सोळा किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरशेळकी गावामध्ये श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांनी समाधी घेऊन सदाचे वास्तव्य करत आहेत. असो.

हा एवढा विस्तार करण्याचे कारण की वाकरडच्या गृहस्थानी आपल्या इच्छापूर्तीसाठी एक छन्त्रीने घोळलेला सुंदर दगड डोक्यावर ठेवून आलेले या न्हाव्याने पाहून श्री तात्यांना असे बोलले होते.

२८.दगड घेऊन मनोरथ पुरविले

श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची कीर्ती ऐकून आपली इच्छा पूर्ण करुन घेण्यासाठी कंधार तालुक्यातील वाकरड गावचे एक गृहस्थ नेहमी विराळगावी तात्यांच्या भेटीस, दर्शनास येवू लागले, बरेच दिवस गेल्यानंतर एक वेळ श्री तात्या या ग्रहस्थास म्हणाले 'अहो तुम्ही माझ्याकडे नेहमी येता पण रिकाम्या हातानेच येता. अरो रिकाम्या हाताने न येता काही तरी घेवून येत जा.' ते म्हणाले, 'महाराज काय आणू त्याची मला आज्ञ द्यावी.' तात्या म्हणाले, 'अहो, माझे नाव धोंडू असल्याकारणाने मला धोंडा दगड आवडतो. तेंव्हा तुम्ही येते वेळी लहान मोठा कसा तरी दगड आणत जा.' ही तात्यांची आज्ञा प्रमाण मानून पुन्हा प्रत्येक वेळी ते दर्शनासाठी आले असता दगड घेवून येऊ लागले. त्या वेळी विराळच्या मठाचे बांधकाम चालू होते. आपल्याकडे येणाऱ्या भक्तजनांना असेच सांगून दगड आणून घेतले. काही भक्तांनी तर बैलगाडीवर दगड आणून दिले. एकंदर सर्वांनीच मठाच्या बांधकामामध्ये अगदी व्यवस्थितपणे मदत केली.

काही दिवस गेल्यानंतर त्यांची दृढ भावना पाहून तात्या प्रसन्न झाले व त्यांना म्हणाले, 'तुम्हाला काय पाहिजे ते मागा. मी द्यावयास तयार आहे.' खरेच संत द्यायला तयार झाले तर

या या संतांचे हे देणे । कल्पतरुहुनि दुणे ।

परिसापरीस अगाध देणे । चिंतामणी ठेंगणा ।। तु.म.

असे त्यांचे अगाध देणे असते. पण हा सामान्य जीव त्यांच्यापुढे कशाची मागणी करणार ? असो ते गृहस्थ म्हणाले, "महाराज, माझी वयाची बरीच वर्षे गेली परंतु मला संतती झाली नाही. त्यामुळे माझ्या प्रपंचात ही उणीव आहे. तेव्हा आपल्या कृपेने मला आता तरी संतती होऊन माझ्या प्रपंचातील ती उणीव भरून निघावी. अशी अपेक्षा आहे." असे सद्गदीत कंठाने बोलत त्यांनी श्री तात्यांच्या चरणी लोळण घेतली व साष्टांग दंडवत घातले.

त्यांची ती तळमळ पाहून श्री समर्थ तात्या आपल्या तपस्वी वाणीने त्यांना म्हणाले, तुम्हाला मुलगा होईल. कांही काळजी करु नका. पण तुम्ही एका व्रताने वागले पाहिजे.

ते म्हणाले, महाराज, आपण सांगाल त्याप्रमाणे कोणतेही व्रत मी परिपूर्ण करतो. पण माझी ही पुत्र इच्छा पूर्ण व्हावी. तात्या म्हणाले, 'तुम्ही दररोज नित्यनियमाने गावच्या मारुतीला पाणी घालून अकरा प्रदक्षिणा नित्याने घाला व वद्य एकादशीला माझ्या भेटीला या. तुमची इच्छा पूर्ण होईल. ते म्हणाले महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे मी हे व्रत आवश्य पाळतो. मी या व्रताचा विसर पडू देणार नाही.

इतके बोलून श्री तात्यांची आज्ञा घेऊन ते गृहस्थ आपल्या गावी परत आले. त्यांना जणू आताच, वर्तमान संबंधीच पुत्र लाभ झाल्याचा आनंद मिळाला. त्याचे कारण त्या गृहस्थाचा श्री तात्यांच्या तचनावर पूर्ण विश्वास असल्याकारणाने त्यांचा काळ आनंदाने जाऊ लागला. पुढे थोड्याच दिवसात दुधामध्ये साखर पडावी त्याप्रमाणे आनंददायक गोष्ट म्हणजे त्यांची गृह स्वामीनी गर्भवती झाली. नवमास पूर्ण भरताच त्यांचा नवस फळाला आला. नेहमीप्रमाणे ते गृहस्थ एकादशीस विराळ गावी श्री समर्थ तात्यांच्या दर्शनासाठी आले व आणलेला बांधकामाचा दगड मठाच्या प्रांगणामध्ये ठेवून श्री तात्यांचे दर्शन घेवून हात जोडून उभे राहीले. त्या वेळी तात्या म्हणाले, अहो तुम्ही इकडे माझ्याकडे आला आहात आणि तिकडे घरी तर पत्नी प्रसूत झालेली आहे. तुम्हाला देवाने मुलगा दिलेला आहे. तेंव्हा तुम्ही आता आपल्या घरी जा. देवाने तुमची इच्छा पूर्ण केली.

श्री समर्थ तात्यांची आज्ञा घेऊन ते हर्षोत्फुल्ल अवस्थेमध्ये घरी आले. तेव्हा घरातील सर्व मंडळी एका आगळ्या वेगळ्या आनंदात होती. त्या आनंदाचे वर्णन ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात प्रतिपादन करावयाचे झाले तर

-वयसेंचिये शेवटी । एकचि विये वांझोटी ।

मग ते मोहाची त्रिपुटी । नाचो लागे ।। ज्ञा.म.

वयाच्या शेवटी अगदी म्हातारपणी एखाद्या वांझोट्या स्त्रीस एकच मुल व्हावे मग काय ? ती स्त्री, ते मूल आणि त्या मुलाचे अनेकविध कोडकौतुक !! अशी ही मोहाची त्रिपुटी जणू नाचू लागते. त्याप्रमाणे त्या घरच्या सर्व मंडळींचा आनंद गगनांत मावेनासा झाला. त्या सर्वांनी पुत्रोत्सव करण्याचे ठरविले.

२९. श्री तात्यांचा आशीर्वाद

श्री समर्थ तात्यांनी आजपर्यंतच्या काळात आपल्याकडे येणाऱ्या ज्या ज्या भक्तांना असे आशीर्वाद व वर दिलेले आहेत. ते ते सर्व सत्य ठरलेले आहेत. अर्थात त्यांनी बोलल्याप्रमाणे भवितव्यात सर्व काही प्रतीतीला आलेले आहे. त्यामुळे सर्वाचा असा भरवसा, असा निश्चय झाला की तात्यांच्या मुखातून निघालेला शब्द तो कालत्रयी असत्य होणार नाही. हे सर्वांना समजून चुकले होते.

किंबहुना संतांनी बोललेले शब्द सत्य होतातच आणि यदाकदाचित त्यामध्ये जर काही प्रतिबंध निर्माण होण्यासारखे दिसले तर या संतांनी, भक्तांनी बोललेले शब्द, त्यांची प्रतिज्ञा स्वतः भगवान सत्य करतात. पूर्ण करतात. हे त्रिवार सत्य आहे.

ज्यावेळी अर्जुनाने जयद्रथ वधाची प्रतिज्ञा केली परंतु ती प्रतिज्ञा असत्य होण्याची वेळ आली तेव्हा भगवान श्रीकृष्णाने आपल्या सुदर्शन चक्राने सूर्य लपविला. आणि अर्जुनाला योग्य मार्गदर्शन करुन ती प्रतिज्ञा अर्जुनाकरवी पूर्ण करुन घेतली. असे संताचे शब्द त्रिवार सत्य ठरतात. असे पुराण प्रसिध्द एकानेक दाखले आहेत.

श्री तात्या मेण्यामध्ये बसून प्रवासात असोत किंवा एकांतात, लोकांतात कुठेही असोत ते निरंतर आपल्या चित्ताची एकाग्रता करून कंठातील रुद्राक्षांची माला काढून हातामध्ये घेऊन सतत जप करीत असत. जपामध्ये कधी खंडणा नव्हती. प्रत्येक क्षण निमिषोनिमिष जप करुन त्यांच्या वाचेचे तप इतके जबरदस्त, दृढ स्वरुपाचे झाले की त्या तपाचा परिणाम असा की,

नातरी चतुराननाचिये वाचे ।

काय आहाती लटकिया अक्षरांचे साचे ? ।। ज्ञा.म.

ब्रम्हदेवाच्या वाणीत खोट्या अक्षरांचे ठसे असतात काय ? म्हणजे ब्रम्हदेव कधी खोटे बोलणार नाही किंवा ब्रम्हदेवाने बोललेले कधीही खोटे होत नाही. हीच पदयोजना श्री समथ तात्यांच्या बाबतीत प्रतिपादन केली तर यत्किंचितही अतिशयोक्ती होणार नाही. उलट ते अन्वर्थक स्वरुपाचे त्यांना शोभण्यासारखे होईल, अशी वस्तूस्थिती आहे किंवा श्री तुकाराम महाराजांच्या शब्दांत प्रतिपादन करावयाचे झाले तर -

लटिके वचन । नाही, देही उदासिन ।। तु.म.

महाराज म्हणतात, ज्यांचे बोलणे लटिके नसते, खोटे नसते अर्थात् त्यांचे बोलणे सत्य अधिष्ठित असते आणि ते देहामध्ये असून उदास वृत्तीने राहतात. म्हणजे देहतादात्म्य भ्रांतिविवर्जित असतात.

अशी तात्यांची वाणी सत्य असल्या कारणाने त्यांच्या आशीर्वादाने हजारो व्यक्तीचे मनोरथ परिपूर्ण व्हावयाचे आणि जर एखाद्याकडे वक्र दृष्टीने पाहिले तर त्याचे जीवन उध्वस्त व्हायचे, एवढा अधिकार समर्थ धोंडूतात्या महाराजांचा होता. म्हणजे त्यांनी जसे बोलले त्याप्रमाणे होतच होते. त्यांच्या जीवनातील एकही शब्द खाली गेलेला नाही. कारण मेघातून तुटलेला पावसाचा थेंब, हाताने समोर फेकलेला दगड आणि संतांनी बोललेला शब्द माघारा होत नाही तद्वतच.... !

३०. संतदर्शनाचे महात्म्य

श्री समर्थ तात्या आपल्या आयुष्याचा काळ भगवद्भजनामध्ये, परमार्थ साधनेमध्ये घालवू लागले. त्यामुळे अवती भवतीची मंडळी त्यांच्या भेटीसाठी येऊ लागली. तसेच त्यांनी विराळगावी करडील्याची दहा एकर जमीन विकत घेतली व तेथे विहीर खोदली. पाणी भरपूर लागले. हा उत्कर्ष काही दुष्ट लोकांना न पाहावल्याकारणाने ते तात्यांच्या विषयी द्वेष भावनेने वर्तन करून मागे पुढे निंदा करु लागले व अधूनमधून कुचेष्टा करु लागले. विराळच्या समीप असलेल्या कुनकी गावचे तीन माणसे सोनवळा गावास चालले होते. वाटेत विराळगावी आले त्यापैकी एक जण म्हणाला, तात्यांच्या दर्शनास दुरुन दुरुन लोक येतात आणि आपण तर अनायासे येथे आलो आहोत. तेव्हा त्यांचे दर्शन घेऊन पुढे जाऊ, हे बोलणे ऐकून दुसरे दोघेही त्याची कुचेष्टा करुन दर्शन घेण्याचे त्यांनी नाकारले.इतक्यात योगायोगाने ज्या व्यक्तींना श्री तात्यांचा उत्कर्ष सहन होत नव्हता व जे नेहमी तात्यांच्या निंदेमध्ये प्रवृत्त होत होते. अशा टवाळखोर चौघा व्यक्तीची यांच्याशी गांठ पडली. तेव्हा ही सर्व खळ मंडळी एकत्रित थांबली. त्या सर्व मंडळीतून हह्या एका व्यक्तीने बाजू देऊन तो श्री तात्यांचे दर्शन घेऊन आला. तेंव्हा ही दुर्जन मंडळी कुचेष्टा करुन निंदा जल्पू लागले. पण ही व्यक्ती त्यांना न बोलता निवांत राहिली.थोड्याच वेळात हे तिघे जण सोनवळकडे निघाले. आभाळ खूप आलेले होते. त्यामुळे काळोख पसरुन अंधारी आलेली होती. ते पाहून काही मंडळीनी त्यांना थांबण्याविषयी आग्रह केला. परंतु पुढे महत्त्वाचे काम आहे असे सांगून ते न थांबता चालू लागले. बराच अंतर चालून गेल्यावर पाऊस सुरु झाला. मेघ गर्जना करु लागले व विजा चमकू लागल्या. पुढे गांव गांठावे म्हणून वेगाने चालू लागले. तेंव्हा ज्या व्यक्तीने तात्यांचे दर्शन घेतले होते त्याला लघुशंका आली. म्हणून तो मागे थांबला. बरोबरीचे दोघे काही अंतर पुढे चालून जाताच आकाशात वीज कडाडली. ती वीज दोघांच्या अंगावर पडून दोघे मृत्यूमुखी पडले. या व्यक्तीने आरडा ओरडा करताच शेतामध्ये वृक्षाच्या आश्रयाला थांबलेली माणसे धावत पळत त्या दोन प्रेताजवळ आले व सर्व जण हळहळ करु लागले. त्यांचे फळ त्या खळांना मिळाले. संत एकनाथ महाराजांच्या शब्दांत हे सांगावयाचे झाले तर

संतासी जो करी छळण । अथवा करी जो उध्दतपण । किंवा करी जो हेळण । तत्काळ पतन तो पावे ।। ए.म.

तसेच

जे उपेक्षिती साधुसंता । त्यासी खस्ता रोकडी ।। ए.म.

तेंव्हा त्या हेळणा निंदा करणाऱ्या इतर चौघास फारच पश्चाताप झाला. ते म्हणाले, ज्या दोघांनी आपल्याबरोबर थांबून हेळणा, निंदा केली, तेच दोघे मरुन ज्याने तात्यांचे दर्शन घेतले तोच कसा वाचला ? असा विचार करुन अनुतापाने त्यांनी निंदा, टवाळी, हेळणा सोडून पुढील जीवनात श्री समर्थ धोंडूतात्या महाराजांची अनन्यभावाने सेवा करु लागले.

म्हणून अनेक साधुसंतांचे अगोदर अफाट छळ करणारे, पुढे पश्चाताप पावून त्यांचे शिष्य झाले आहेत. साधुसंतांजवळ अशा कार्यक्रमाचा कारखानाच चालू असतो. संताचे जीवन याच कार्यासाठी वाहिलेले असते. जगात संताचा उत्कर्ष अशा लोकांकडून आणि अशा लोकाचा उध्दार संताकडून !! असे राहट गाडगे अनादि चालू आहे.

हे चरित्र आपल्याला शिकवते की भक्ती, संतश्रद्धा आणि गुरुकृपा यामुळेच जीवनाला खरी दिशा मिळते.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने